गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 (08:54 IST)

नोकरी निश्चित मिळेल, हे करुन तर बघा

स्पर्धेच्या या काळात नोकरी मिळणे आणि ती टिकवून ठेवणे फार कठिण झालं आहे. चांगली नोकरी मिळाल्यावरही काही न काही अडथळे, समस्या येत असतात. असेही लोक आहे जे आपल्या कामात परफेक्ट आहे तरी त्यांना नोकरीसाठी भटकावं लागत आाहे. नोकरी न मिळणे किंवा नोकरीत समस्या आल्यावर सर्व नशिबाकडे बोट दाखवू लागतात परंतु असे घडते ते वास्तु दोषामुळे- 
 
काही वास्तु टिप्स आहेत जे अमलात आणून आपण नोकरीसंबंधी समस्या सोडवू शकता. सोबतच प्रमोशन देखील होऊ शकतो. जाणून घ्या सोप्या वास्तु टिपा-
 
नोकरीत येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी विघ्नहर्ता गणपतीचा फोटो किंवा मूर्ती लावावी. गणपतीची सोंड उजवीकडे वळलेली असावी.
सात वेगवेगळ्या प्रकाराचे धान्य मिसळून पक्ष्यांना खाऊ घातल्याने लाभ मिळतो.
जर आपण नोकरीच्या शोधात असाल तर नेहमी घरातून काही गोड खाऊन निघावे. याने सकारात्मक परिणाम मिळतात.
नोकरीसाठी घरातून निघत असताना पांढर्‍या गायीला गुळ खाऊ घालावं. याने आपल्याला लाभ मिळेल.
जर आपण नोकरीच्या शोधात असाल तर इंटरव्यूसाठी जाताना खिशात लाल रंगाचा कपडा किंवा रुमाल ठेवावा.
घरात आढळणार्‍या सकारात्मक ऊर्जेचा देखील आमच्या जीवनात आणि नोकरीवर प्रभाव पडतो. म्हणून घराच्या उत्तर दिशेत आरसा लावावा.