मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (00:50 IST)

जिना पूर्व-दक्षिण दिशेलाच का असावा

वास्तुशास्त्रानुसार घरातील जिना पूर्व अथवा दक्षिण दिशेला असणे अत्यंत शुभ मानला जातो. जर तुम्ही घरात गोलाकार जिना तयार करण्‍याचे प्लॅनिंग करत असाल तर आधी हे लक्षात घेणे आवश्यक ठरते की, गोलाकार जिना हा नेहमी पूर्व-दक्षिण, दक्षिण-पश्चिम, पश्चिम- उत्तर व उत्तर- पूर्व दिशेला जाणारा पाहिजे. चढताना हा जिना नेहमी डाव्या बाजूने उजव्या बाजूला जाणारा असावा.
 
जिन्यातील पायर्‍यांची संख्या नेहमी विषम ठेवली पाहिजे. एक सामान्य फार्मूला आहे. पायर्‍यांची संख्येला 3 ने विभाजित करून बाकी 2 ठेवल्या पाहिजे. 5, 11, 17, 23, 29 अशा जिन्याच्या पायर्‍यांची संख्या ठेवावी.