मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (11:54 IST)

वास्तूशास्त्रात सूर्यकिरणांचे काय महत्व आहे जाणून घ्या...

रोगराई पसरवणारे रोगजंतू, बँक्टरिया सूर्यकिरणांमुळे नष्ट होतात. म्हणूनच वास्तूशास्त्रात पाण्याचे अण्डर ग्राऊण्ड टँक पुर्व किंवा उत्तर दिशेला विशेषता ईशान्य दिशेला खोदणे सर्वात चांगले मानले जाते. कारण त्यामुळे सुर्याची किरणे पाण्याच्या तळापर्यंत पोहचतील व जीवजंतूंचा नाश करून पाणी स्वच्छ होऊन पाण्यात उर्जा परावर्तीत करतील. याचप्रमाणे over head tank हे नैऋत्येला असावेत. म्हणजे सकाळचे कोवळी सूर्यकिरणे पाण्यात जाऊन पाणी निर्जंतूक बनवेल.
 
काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी सूर्याच्या किरणांपासून मिळणारी उष्णता व त्यांच्या रंगाच्या बाबतीत संशोधन केले. पण आपल्या ऋषीमुनींनी मात्र कोणत्याही उपकरणांच्या मदतीशिवाय सुर्याचे रंग, ऊर्जा व त्याची उष्णता यांचा शोध तर लावलाच पण त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांना नावे पण ठेवली.
 
जयन्त, पर्जयन्त, आदित्य, भुज, सत्य, महेन्द्र, अग्नि ही नावे म्हणजेच आपले सप्तरंगच आहेत. झाडे प्राणवायु तर निर्माण करतातच पण अन्नही तयार करतात. वनस्पतीत असणारी हरीतद्रव्ये सुर्याच्या प्रकाशाच्या मदतीने स्वत:चे अन्नही तयार करतात. या कामी ते जमीनीतील पाणी व हवेतील कार्बन डाय आँक्साइड (co2) वापरतात. त्यात उर्जे सोबतच आँक्सीजनचीही निमिती होते. याच क्रियेला photosynthesis प्रकाश संश्लेषण म्हणतात. 
 
आँक्सीजन प्रत्येक सजिवाला जगण्यासाठी आवश्यक असतो. त्यामुळे वास्तूशास्त्रात घराच्या पश्चिमेला तसेच दक्षिणेला मोठी झाडे लावावीत असे सांगितले आहे. याशिवाय झाडे पानांच्या मदतीने कसे अन्न तयार करतात, कशा तर्‍हेने सूर्यापासून मिळाणार्‍या प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर होते, कशा तर्‍हेने प्राणवायू तयार होतो ही सर्व माहिती स्थापत्य वेदात आहे. यात मुलभूत गोष्टींवरून वास्तूशास्त्राचे नियम बनविले गेले आहेत. त्यामुळेच वास्तूशास्त्रात सूर्य व त्याचे प्रकाशकिरण व त्याच्यापासून मिळणारी ऊर्जेचे फारच महत्व आहे.