1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (22:23 IST)

या 5 संकेतांपैकी कोणतेही एक संकेत मिळाले तर समजून घ्या की तुमच्यावर पैशांचा वर्षाव होणार

gold-money
जीवन म्हणजे सुख-दुःखाचा संगम. माणसाच्या आयुष्यात दु:खामागे सुख नक्कीच येतं. विशेषत: साडेसाती असणार्‍या जातकांच्या शेवटच्या टप्प्यात शनिदेवाची कृपा निश्चितच होते.  तर दुसरीकडे जेव्हा वेळ चांगली येणार असते किंवा तुम्ही श्रीमंत होणार आहात, तेव्हा काही शुभ चिन्हे आधीपासूनच याकडे संकेत करतात.
 
यापैकी ही 5 चिन्हे अतिशय शुभ मानली जातात. तुम्हालाही या गोष्टी दिसल्या तर समजून घ्या तुमचे नशीब खुलणार आहे. जाणून घेऊया-
 
शास्त्रानुसार शरीराच्या उजव्या भागाचे अवयव फडफडणे शुभ असते. येत्या काळात तुम्ही श्रीमंत होऊ शकता हे लक्षण आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर घरात सुख-समृद्धी येईल. जर तुमचा उजवा गाल आणि हात देखील फडफडत असेल तर ते एक चांगले चिन्ह आहे.
 
घराच्या मुख्य दरवाज्यासमोर आकड्याचे रोप उगवणे हे देखील श्रीमंत होण्याचे लक्षण आहे. जर तुमच्या घरासमोर आकचं रोप उगवत असेल तर ते शुभ काळ लवकर येण्याचे लक्षण आहे.
 
घरात काळ्या मुंग्यांचा थवा श्रीमंत होण्याचे लक्षण आहे. जर तुम्हाला तुमच्या घरात काळ्या मुंग्यांची रांग दिसला तर समजा लवकरच तुमच्या घरी लक्ष्मी येणार आहे.
 
घरात मांजरीने पिल्लूंना जन्म दिला तर ते शुभ लक्षण आहे. तसेच पक्ष्याद्वारे छतावर काहीतरी मौल्यवान टाकणे देखील शुभ आहे. म्हणजे तुमच्या घरातआनंदाचे आगमन लवकरच होणार आहे.
 
जर तुमच्या उजव्या हाताच्या तळहाताला खूप दिवसांपासून खाज येत असेल तर हे एक शुभ चिन्ह आहे की तुमच्याकडे लवकरच पैसा येणार आहे. त्याच वेळी उजव्या बाजूचा डोळा फडफडणे हे देखील संपत्तीच्या आगमनाचे संकेत देतात.