बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (22:31 IST)

Peacock Feather Remedies घरात मोरपीस ठेवणे असते शुभ, जाणून घ्या 7 चमत्कारी उपाय

peacock feather
मोरपीस दिसायला जेवढे सुंदर आहे, तेवढ्याच कामाचे देखील आहे. मोरपीस आपल्या काही त्रासांचे निरसन करू शकतात. घरगुती क्लेश दूर करण्यापासून ते धनप्राप्तीसाठी मोरपीस वापरले जाते. मोरपिसांचे चमत्कारिक उपाय जाणून घेऊया......
 
1 घराच्या मुख्य दारावर मोरपीस लावावे, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि कीटक -प्राणी येत नाही. यासाठी 3 मोरपीस लावून ॐ द्वारपालाय नम: जाग्रय स्थापयै स्वाहा' असा मंत्र लिहून खाली गणपतीची मूर्ती लावावी.
 
2 आर्थिक लाभ मिळविण्यासाठी एखाद्या देऊळात जाऊन मोरपिसाला राधा आणि कृष्णाच्या मुकुटामध्ये लावावे आणि 40 दिवसानंतर हे आणून आपल्या तिजोरी मध्ये ठेवावे.
 
3 वाईट नजर पासून वाचविण्यासाठी जन्मलेल्या बाळाला मोरपीस चांदीच्या तावीज मध्ये घाला.
 
4 आपला मुलगा हट्टी असल्यास किंवा जास्त रडत असल्यास घराच्या छतावर मोरपीस लावल्याने मुलांचा हट्टीपणा कमी होतो.
 
5 आपण आपल्या विरोधकांकडून त्रासला असल्यास मोरपिसावर मारुतीच्या कपाळावरचे शेंदूर, दर मंगळवारी आणि शनिवारी त्यांचे नाव घेऊन लावावे आणि सकाळी तोंड न धुता त्याला वाहत्या नदी मध्ये प्रवाहित करावं.
 
6 आग्नेय कोणामध्ये मोरपीस लावल्याने घरातील वास्तुदोष नाहीसे होतात. या व्यतिरिक्त ईशान्य कोणामध्ये श्रीकृष्णाच्या तसबिरीसह मोरपीस लावावे.
 
7 ग्रहांच्या अशुभ परिणाम झाल्यावर मोरपिसावर 21 वेळा ग्रहाचे मंत्र उच्चारून पाणी शिंपडावे आणि चांगल्या जागी ठेवावे जिथून हे आपल्याला दिसेल.