गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 21 ऑगस्ट 2018 (12:04 IST)

जेव्हा जीवनात हे 5 संकेत मिळू लागतात, तर समजून घ्या तुम्ही होणार आहात श्रीमंत

पुराणात सांगण्यात आले आहे की जर कोणावर धनलक्ष्मीची कृपा असेल तर त्याच्या घरी कधीपण धन- वैभवाची कमी नसते पण असे देखील सांगण्यात आले आहे की लक्ष्मी ऐकाजागेवर जास्त दिवस टिकून राहत नाही. लक्ष्मी चंचल असते.  
 
देवीची कृपा होण्याचे पहिले संकेत असे आहे की जेव्हा तुमच्या जवळपास अचानकच सर्व हिरवागार दिसू लागेल तर समजा लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे.  
 
झाडू आणि लक्ष्मीचे घनिष्ठ संबंध आहेत. अशात जर तुम्हाला कोणी सकाळी सकाळी झाडू लावताना दिसेल तर समजा तुम्ही लवकरच श्रीमंत बनणार आहात.  
 
शंखाची आवाज ऐकू येणे देखील तुमच्या घरात लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहे. जर तुमच्यासोबत असे होत असेल तर समजून घ्या लवकरच तुमचा भाग्योदय होणार आहे.  
 
पहाटे पहाटे ऊस दिसणे शुभ मानले जाते. जर तुम्हाला सकाळी अचानक तुमच्या जवळपास ऊस दिसत असेल तर हे स्पष्ट संकेत आहे की तुमचे दिवस फिरणार आहे.