बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 ऑगस्ट 2018 (08:50 IST)

आता दारूच्या बाटलीवर आरोग्य इशारा छापणे अनिवार्य

पुढील वर्षापासून दारूच्या बाटलीवर एक आरोग्य इशारा छापणे अनिवार्य होणार आहे. सदरचा इशारा व्हिस्की, रम, व्होडका, प्रकारांतील सर्व ब्रॅण्डवर छापला जाईल. जागतिक आरोग्य संघटनेसोबत हिंदुस्थानने अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने दारूंच्या बाटल्यांवर हा इशारा देण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत.एप्रिल २०१९ पासून नवे मार्गदर्शक तत्वे लागू होतील. ‘दारू पिणे आरोग्यास हानीकारक असून दारू पिऊन गाडी चालवू नये.’ असा संदेश दारूच्या बाटलीवर लिहिला असेल. आरोग्य इशारा हा ठळक अक्षरांत लिहावे असे मार्गदर्शक तत्वांत नमूद केले आहे. असाच इशारा तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावर छापण्याचाही आदेश सरकारने दिले होते. हा इशारा दारूच्या बाटलीवर नमूद केल्याने लोकांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण कमी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.