शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तुसंदर्भातील काही महत्वाच्या टिप्स..

पती-पत्नीचा पलंग खिडकीजवळ ठेवू नये. त्यामुळे नात्यामध्ये तणाव आणि मतभेद निर्माण होतात. जर खिडकीजवळ पलंग ठेवणे आवश्यकच असेल तर आपले डोके आणि खिडकीमध्ये पडदा लावावा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडणार नाही.

सकारात्मक ऊर्जा कशी वाढवावी

वास्तुशास्त्रानुसार घरातील दक्षिण-पश्‍चिम भाग कौटुंबिक नात्यांसाठी अँक्टिव्ह मानला जातो. या भागात सकारात्मक ऊर्जेला सक्रिय आणि नकारात्मक ऊर्जेला निष्क्रिय करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते शुभ ठरतील.

तसेच नकारात्मक प्रभाव टाकणार्‍या वस्तू घरात ठेवू नयेत.

नवीन दाम्पत्याचे अंथरुण-पांघरुण सर्व नवीन असावे.

तसेच पती-पत्नीच्या पलंगाखाली कोणतीही वस्तू ठेवू नये. पलंगाखालील जागा रिकामी असावी. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा सक्रिय होते.

तसेच पलंगाच्या अवती-भोवती कोणतीही अडगळ जाणवणारी वस्तू ठेवू नये. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये खेळत नाही.

बेडरूममध्ये कोणतेही यंत्र ठेवू नये. कारण यामधून निघणारे हानिकारक तरंग आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

रंगाचाही आपल्या नात्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे बेडरूममध्ये फिकट गुलाबी, निळा, पिवळा, पोपटी असे रंग लावावे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात राहते.