शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

तुळशीचे रोप घरात लावल्याने होतील 5 फायदे

घरात तुळशीचे रोप नक्कीच असायला पाहिजे. शास्त्रानुसार तुळशीला चांगले मानले गेले आहे. तसेच विज्ञानात देखील तुळशीचे बरेच गुण सांगण्यात आले आहे. त्याशिवाय वास्तू शास्त्राात देखील तुळशीला महत्त्वपूर्ण मानण्यात आले आहे. वास्तुत म्हटले जाते की तुळशीचे रोप असल्याने घरातील बरेच दोष दूर होतात. आम्ही जाणून घेऊ वास्तूनुसार तुळशीच्या फायद्याबद्दल :  
 
1. वास्तूनुसार जर तुमचा बिझनस चांगला चालत नसेल तर तुम्ही पौर्णिमाच्या दिवशी तुळशीला कच्चे दूध अर्पित करा. असे केल्याने  तुमच्या घरात भरभराट होईल आणि बिझनसमध्ये येणार्‍या अडचणी दूर होतील.  
 
2. जर कुटुंबात भांडण सुरू असतील किंवा परिवारातील लोक एकमेकाशी बोलणे पसंत करत नसतील तर स्वयंपाक घरात तुळशीचे रोप ठेवा.  असे केल्याने कुटुंबातील लोकांमध्ये आपसात प्रेम वाढून वाद विवाद संपुष्टात येतील.  
 
3. जर घरात मुलं आई वडिलांचे ऐकत नसतील तर पूर्व दिशेच्या खिडकीजवळ तुळशीचा पौधा ठेवा. याने मुलं आई वडिलांचे म्हणणे ऐकतात.  
 
4. जर घरात अविवाहित मुलगी असेल आणि तिच्या लग्नात अडचणी येत असेल तर याचा उपाय देखील तुळशीत लपला आहे. दक्षिण-पूर्वीकडे तुळशी ठेवून त्याला रोज पाणी चढवल्याने कन्येच्या विवाहातील अडचणी दूर होतात.  
5. जर तुम्हाला आरोग्य संबंधी कुठलेही तक्रार असतील तर पूर्व दिशेकडे ठेवलेल्या तुळशीच्या पानाला पूर्वीकडे तोंड कडून खाल्ल्याने बर्‍याच रोगांपासून मुक्ती मिळते.