1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 26 नोव्हेंबर 2018 (08:51 IST)

Vastu Tips : मुख्य दारासमोर वेल नसावी

vastu tips
आपल्या घराचा दरवाजा दिवसाने नेहमी खुले ठेवले पाहिजे. तसेच दरवाज्यासमोर किंवा त्याच्या आसपास पानाफुलांच्या वेली लावू नये. ते लावल्याने घराचे मुख्यद्वार झाकले जाते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येत नाही. 
 
घराच्या समोर बगीचा करून त्यात विविध प्रकारचे फळे, फुले झाडे लावावीत. परंतु त्याने घराचा दरवाजा झाकला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. घराच्या भिंतीवरून वर चढणारे वेल आपल्या प्रगतीत बाधा उत्पन्न करू शकतात. तसेच आपल्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होत असतात.
 
घराच्या मुख्य दरवाज्यासमोर कार, स्कूटर किंवा सायकल ठेवू नयेत. त्याने आपल्या जीवनात चांगल्या संधी येत नाहीत.