शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

पूजा करताना आपण तर नाही करत या चुका?

रोज सकाळी उठून देवाची आराधना केली जाते. जास्तकरून लोकांना पूजेशी निगडित गोष्टी आणि विधीची योग्य माहिती नसते. तसे धार्मिक मान्यतेनुसेार असे म्हटले जाते की देव फक्त भक्तीचा भुकेला असतो. पण आपल्याला पूजेशी निगडित गोष्टींबद्दल माहिती असणे फारच गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत याबद्दल काही माहिती :      
 
* पूजेसाठी जर तुम्ही पाण्याचा वापर करत असाल तर ते पाणी गाळून घ्यावे.  
 
* देवी-देवतांना तिलक करण्याअगोदर नेहमी लक्षात ठेवावे की त्यांना अनामिका बोटानेच तिलक करावे. बाकी कुठल्याही बोटाने तिलक करु नये.
 
* पूजेत जर शंख ठेवत असाल तर या गोष्टीचे ध्यान ठेवायला पाहिजे की शंखाला पाण्यात बुडवून नव्हे तर शंखात पाणी भरून ठेवावे आणि पूजेनंतर या पाण्याला घरात छिंपडावे. असे केल्याने वास्तू दोष दूर होण्यास मदत मिळेल.   
 
* पूजा करताना दिव्याचे तोंड नेहमी पूर्व दिशेत असायला पाहिजे. दक्षिण दिशेकडे दिव्याचे तोंड असल्यास धनहानी होते.  
 
* पूजेत जर नैवेद्य ठेवत असाल तर या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे की पाण्याचा चोकोर घेरा बनवून त्यावर नैवेद्य देवाच्या उजवीकडे ठेवायला पाहिजे.