शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

आवळा नवमीला काय करावे काय नाही, जाणून घ्या

पुराणांप्रमाणे अक्षय नवमी अर्थात आवळा नवमीच्या दिवशी केलेल्या पुण्याचे फल अनेक जन्मांपर्यंत पाठोपाठ जात राहतं. तसेच या दिवशी पाप केल्यास अनेक जन्म त्याचे फल भोगावं लागतं म्हणून या दिवशी कोणतेही चुकीचे कार्य करू नये. या दिवशी शास्त्राविरुद्ध वागणे आपल्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. कोणाचाही मन दुखेल असे काहीही या दिवशी वागू नये.
 
आता बघू पूजा कशी करावी
 
तर सर्वात आधी अंघोळ करताना पाण्यात आवळ्याचा रस मिसळावे. असे केल्याने आपल्या जवळपास असलेली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होती. सकारात्मकता आणि पवित्रता वाढते.
आवळ्याच्या वृक्षाखाली पूर्वीकडे तोंड करून बसावे.
अक्षय नवमीला आवळ्याच्या झाडावर प्रभू विष्णू आणि महादेव निवास करतात असे मानले आहे. या दिवशी स्नान, पूजन, तर्पण आणि अन्नदान याचे अत्यंत महत्व आहे.
पूजेआधी आवळ्याच्या झाडाखाली झाडूने साफ-सफाई करावी.
नंतर आवळ्याच्या झाडाची व देवी लक्ष्मीची पूजा करावी.याने पापांचा नाश होतो.
नंतर दूध, फुलं आणि धूप दाखवून पूजन करावे. 
सात प्रदक्षणा घालाव्या.
झाडाच्या सावलीत आधी ब्राह्मण भोजन करवावे नंतर स्वत: आहार ग्रहण करावा.
 
पुराणात उल्लेखित असल्याप्रमाणे जेवताना ताटात आवळ्याचे पान पडल्याने भाग्य उजडतं. हे मंगल कार्य घडण्याचा संकेत समजावा. याने येणारा वर्ष आरोग्या दृष्ट्या उत्तम जाईल असे मानले गेले आहे. आवळ्याच्या झाडाखाली जेवण्याची प्रथा देवी लक्ष्मी यांनी सुरु केली होती.
 
तरी आवळ्याच्या झाडाची पूजा आणि त्या खाली बसून जेवण करणे शक्य नसेल तर आवळा नक्की खावा.
 
चरक संहिता यात उल्लेख आहे की अक्षय नवमीला महर्षि च्यवन यांनी आवळा खाल्ला होता ज्यामुळे त्यांनी पुन्हा यौवन प्राप्त झाले होते. म्हणून आपण ही आवळ्याचे सेवन करून आणि हे उपाय करून नवयौवन प्राप्त करू शकतात. शास्त्रांप्रमाणे 
 
दररोज आवळ्याचा रस पिण्याने आरोग्य तर उत्तम राहतचं आणि धार्मिक दृष्टया पाप नष्ट होऊन पुण्यात भर पडते.