वास्तुनसार दुकानात देवी देवतांचे चित्र कोणत्या दिशेत लावायला पाहिजे
'प्रवेश दाराच्या उजव्या हाताला गणेशाची आणि लक्ष्मीदेवतेची मूर्ती स्थापणे शुभ लक्षणी मानले जाते.
लक्ष्मीदेवीचे चित्र दुकानाच्या ईशान्य दिशेस लावणे शुभलक्षणी समजले जाते.
दुकानामध्ये स्वस्तिका सारखे शुभ चिन्ह आणि ‘शुभलाभ’ सारखा शब्दप्रयोग लिहिला पाहिजे.
ईशान्येकडील कोपर्यात पाण्याचा नळ किंवा छोटी पूजेची जागा कोरावी किंवा तयार करावी.
दुकानातील सारी छायाचित्रे आणि मूर्त्या पूर्वेस किंवा पश्चिमेकडे तोंड करून असाव्यात.
दुकानात मूर्तीची स्थापना करताना दक्षिणायन आणि उत्तरायणाचे भान ठेवावे. देऊळाची जागा कोपर्यात नसावी.
भग्न मूर्तीस देऊळात किंवा दुकानात कालत्रयी ठेऊ नये. तापट स्वभावाच्या देवता उदाहरणार्थ नरसिंह आणि दुर्गेची स्थापना आणि संस्कार दक्षिणायनातच करावी .
देवळात किंवा भोवताली टाकाऊ सामुग्री ठेऊ नये.