मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 27 जुलै 2019 (09:35 IST)

वास्तुदोषपासून बचाव करण्यासाठी काही सल्ला!

कामगारांची खोली नैऋत्येस कालत्रयी नसावी. कामगार गृहात टॉयलेट्स गृहाच्या वायव्येस किंवा आग्नेय दिशेस असावी.
 
कारखान्याच्या मालकाला नैऋत्येस, पूर्वदिशेस किंवा उत्तरेकडे असणे श्रेयस्कर. कारभार खात्याचा भाग उत्तरेस किंवा पूर्वेकडे असावा.
 
खेळाच्या मैदानाची समलांबी जॉमेट्री विषम लांबी जॉमेट्रीपेक्षा श्रेष्ठ मानली जाते. मार्ग किंवा निगडीत असणार्या प्लॉटच्या पूर्वेकडचा किंवा उत्तरेचा तळभाग खेळाच्या मैदानापेक्षा खोलगट नसावा. 
 
घर बांधताना आपण आधी हे विचारात घेतले पाहिजे, की निसर्ग व मानव यांचा समन्वय साधला जाऊन मानवाला त्याचा फायदा झाला पाहिजे. आरोग्यदायी जीवन लाभावे तसेच ‍जीवनातील सर्व दु:खांचा नाश होऊन सुख लाभावे.
 
जर प्लॉट एखाद्या डोंगरी भागात असेल तर उतरण पूर्व आणि उत्तर दिशेकडे असावी. कोणताही कालवा, तलाव, नदी, विहिर, डबके प्लॉटच्या उत्तरे किंवा पूर्वेस असावे. प्लॉटच्या उत्तरेस किंवा पूर्वेस एखादा मोठा वृक्ष नसावा.
 
झोपताना नेहमी दिशेचे भान ठेवायला हवे. जोडीदाराचे डोके नेहमी दक्षिणेकडेआणि पाय उत्तरेकडे हवे. कधीही बेडरूममध्ये बेडच्या समोर टी. व्ही. किंवा ड्रेसिंगटेबल नसावा.
 
डायनिंग टेबल चौरस किंवा चतुष्कोणिय असावे, अंड्याच्या किंवा इतर कोणत्याही आकाराचे टेबल चांगले नसते. डायनिंग टेबल भोजनगृहाच्या मधोमध ठेवण्यात यावे.
 
तिजोरीच्या खोलीचे दार ईशान्येस, पूर्वेस किंवा उत्तरेकडे ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. लॉकर दक्षिण दिशेत ठेवावे आणि ते उत्तरेकडे किंवा पूर्वीकडे उघडले जावे.
 
त्रिकोणी प्लॉट शुभ असल्याचे मानण्यात येत नाही, कारण तशा प्रकारचा प्लॉट भागीदार आणि काम करणारे यांच्या वतीने अडचणींना निर्माण करणारा ठरू शकेल. अनियमित आकार नसलेले आणि बेढप प्लॉट बांधकामासाठी चांगले नसतात. 
 
दक्षिणेची किंवा पश्चिमेकडील तटबंदी इतर भिंतीच्या तुलनेने अधिक भक्कम असावी कारण तिच्या बाबतीत सुरक्षेच्या जास्त खबरदारीची गरज असते.
 
दार किंवा खिडक्या कुठल्याही खोलीचा महत्त्वपूर्ण भाग असतो. त्याद्वारे खोलीत सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. वास्तुदोषापासून वाचण्यासाठी बेडरूमचे मुख्य द्वार उत्तर-पूर्व दिशेला असायला हवे.
 
दिवाणखाना आधुनिक पठडीतला असेल तर फर्नीचर दक्षिण आणि पश्चिम दिशेत राखणे योग्य आहे. दिवाणखान्याचा उत्तर आणि पूर्वेकडचा भाग शक्य असेल तेवढा मोकळा ठेवावा. 
 
दिवाणखान्यात अणकुचीदार कोपर असलेला टेबल ठेऊ नये, कारण त्यामुळे वाद आणि मतभेद यांचे पेव फुटू शकेल. तिजोरी कधीही दिवाणखान्यात ठेऊ नये, कारण त्यामूळे आर्थिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. 
 
दुकानातील सज्जे किंवा खालची छप्पर दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे असावीत. दुकानात ईशान्य दिशेकडचा कोपरा मोकळा असावा. हा कोपरा कोणत्याही प्रकारची सामुग्री साठवण्यासाठी वापरण्यात येऊ नये. 
 
दुकानातील सारी छायाचित्रे आणि मूर्त्या पूर्वेस किंवा पश्चिमेकडे तोंड करून असाव्यात. दुकानात मूर्तीची स्थापना करताना दक्षिणायन आणि उत्तरायणाचे भान ठेवावे.