बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जुलै 2019 (14:35 IST)

किचनबद्दल फेंगशुई काय म्हणते?

फेंगशुईत दक्षिण ही दिशा अग्नी तत्त्वाची सांगितलेय. त्यामुळे किचन दक्षिणेलाच असावं असं फेंग-शुई म्हणते. विशेष: हॉटेलचं किचन दक्षिणेला असेल तर हे हॉटेल खाद्यपदार्थांच्या चवीमुळं नावारूपाला येतं, अशी धारणा चीनमध्ये आहे.
 
घर पूर्व गटाचं आहे की पश्‍चिम यावरूनसुद्धा तेथे किचन कुठे ठेवायचं ते ठरवतात. घर पूर्व गटाचं असेल तर त्यासाठी पूर्व, उत्तर, आग्नेय व दक्षिण या दिशा शुभ ठरतात. 
 
आग अशुभत्वाला जाळणारी असल्यानं अशा घरात पश्‍चिम, वायव्य, नैर्ऋत्य, ईशान्य यापैकी दिशेत किचन ठेवतात, तर पश्‍चिम गटाच्या घरात पूर्व, उत्तर, आग्नेय व दक्षिण यापैकी दिशेत किचन ठेवलं जातं.