मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 7 जानेवारी 2017 (00:04 IST)

उद्योग धंद्यात यश मिळवायचे असेल तर बेडरूममध्ये ठेवा या वस्तू

vastu tips for business
उद्योग धंद्यात जर वास्तूच्या नियमांचे पालन केले तर नक्कीच तुमच्या उद्योगात वाढ होते. वास्तू शास्त्रानुसार, प्रत्येक प्रकारच्या  उद्योगाची आपली एक वेगळी ऊर्जा असते. ज्याचे योग्य प्रकारे प्रयोग केल्याने व्यापारात कधीही पैशाची तंगी येत नाही. तसेच जर व्यापारी व्यवसायानुसार आपल्या बेडरूमध्ये या वस्तूंना ठेवतात तर वास्तुशास्त्रानुसार त्यांना नक्कीच यश मिळतो.  

सोने-चांदीचे व्यापारी :-
सोने-चांदीच्या व्यापार्‍याला व्यवसायात वाढ करण्यासाठी बेडरूममध्ये मोरपंख लावायला पाहिजे. मोर पंख जर चांदीचे असेल त्याचे त्वरित फायदा मिळतो.  
 
कपड्यांचे व्यापारी :-
कपड्यांच्या व्यापारीला व्यवसायात वाढ करण्यासाठी आपल्या बेडरूममध्ये लाल रंगाची ओढणी ठेवायला पाहिजे. ओढणीला कपड्याच्या अलमारीत ठेवावे.  
 
बिल्डिंग मटेरियलचे व्यापारी :-
बिल्डिंग मटेरियलच्या व्यापारीला आपल्या बेडरूममध्ये काळ्या किंवा ब्राऊन रंगाचा एखादा शो-पीस किंवा फोटो ठेवायला पाहिजे.  असे केल्याने व्यवसायात वाढ होईल.  
 
भाड्यांचे व्यापारी :-
भांड्यांच्या व्यापारीला उद्योगात यश मिळवण्यासाठी आपल्या बेडरूममध्ये तांब्याचा लोटा ठेवायला पाहिजे, जर तांब्याचा लोटा नसेल तर तांबत्याचा एखाद्या शो पीस ठेवायला पाहिजे.  
 
फर्निचरचे व्यापारी :-
फर्निचर किंवा लाकडाच्या सामानाच्या व्यापारीला आपल्या बेडरूममध्ये बासुरी ठेवायला पाहिजे. असे केल्याने व्यापारात होणार्‍या नुकसानीला तुम्ही टाळू शकता.   
 
मोटार गाड्यांचे व्यापारी  :-
मोटार गाड्यांच्या व्यापारीला आपल्या बेडरूममध्ये तांब्याचा पिरामिड ठेवायला पाहिजे, याने व्यवसायात वाढ होते.  
 
किरानाच्या व्यापारी :-
किराणा किंवा खाद्य पदार्थासंबंधित व्यापार्‍याला बेडरूममध्ये गायीची मूर्ती किंवा फोटो ठेवायला पाहिजे. असे केल्याने त्यांना व्यवसायात नक्कीच लाभ मिळेल.  
 
इलेक्ट्रॉनिक सामानाचे व्यापारी :-
मोबाइल, टीव्ही सारखे इलेक्ट्रॉनिक सामानाच्या व्यापारिला आपल्या बेडरूममध्ये क्रिस्टल लटकवून ठेवायला पाहिजे. असे केल्याने व्यापारात धन संबंधी लाभ मिळतो.  
 
औषधांचे व्यापारी :-
औषधांच्या व्यापारीला आपल्या बेडरूममध्ये सूर्याची मूर्ती किंवा फोटो लावायला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने व्यापारमध्ये होणार्‍या नुकसानीपासून बचाव होऊ शकतो.  
 
जोडे चपलांचे व्यापरी :-
जोडे चपलांच्या व्यापारीला आपल्या बेडरूममध्ये काळ्या रंगाचा एखादा शो पीस ठेवायला पाहिजे. असे केल्याने त्याला व्यापारात फायदा होतो.  
 
संगीत संबंधित सामानाचे व्यापारी :-
संगीत-कलाशी निगडित सामानांच्या व्यापारीला आपल्या बेडरूममध्ये वीणा किंवा बासुरी ठेवायला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने व्यापारात नक्कीच वाढ होते.