मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

मनाप्रमाणे जोडीदार हवा असल्यास, हे करा

लग्नाचे वय झाले आणि तुम्ही आता लग्न करायचे मन बनवले असेल आणि तुम्ही वास्तूचे हे नियम अमलात आणले तर तुम्हाला नक्कीच मनाप्रमाणे जोडीदार मिळेल व तुमचे लग्न लवकरच होईल.   
 
वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार विवाह इच्छुक मुलं मुलींनी काळ्या रंगांचे वस्त्र परिधान करणे टाळायला पाहिजे. याचे मुख्य कारण असे आहे की काळा रंगाला शनी, राहू आणि केतू हे तीन ग्रह प्रतिनिधित्व करतात, जे विवाहात बाधक असतात. जर तुम्ही प्रेम विवाह करत असाल किंवा पारंपरिक पद्धतीने विवाह करत असाल तरी या दोन्ही स्थितीत या गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे.  
 
अविवाहित मुलं मुली जे घरापासून दूर राहून नोकरी किंवा अभ्यास करत असतील, जास्तकरून रूम शेअर करतात अर्थात भाड्याने घर घेऊन मित्रांसोबत राहतात. जर तुम्ही या प्रकारे राहत असाल तर तुमच्या लग्नात येणार्‍या अडचणींना दूर करण्यासाठी आणि मनाप्रमाणे जोडीदार मिळवण्यासाठी आपला बेड दाराजवळ लावायला पाहिजे.  
 
विवाह इच्छुक लोकांना या गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशा प्रकारे बसवायला पाहिजे की त्यांचे तोंड घराच्या आतल्या बाजूस असावे. ज्यांना लग्नात अडचणी येत असतील त्यांनी या गोष्टींकडे नक्की लक्ष द्यायला पाहिजे.  
 
विवाह इच्छुक व्यक्तीला झोपताना आपले पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिण दिशेकडे ठेवायला पाहिजे.   
 
मनाप्रमाणे जोडीदार आणि लवकर लग्न जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला पाहिजे जेथे एकापेक्षा जास्त दार असतील.  
 
वास्तू विज्ञानानुसार विवाह इच्छुक लोकांना आपल्या खोलीत गुलाबी, हलका पिवळा, पांढरा रंग करवायला पाहिजे.   
 
विवाह इच्छुक लोकांना आपल्या घराच्या दक्षिण-पश्चिम भागात लाल फुलांची पेंटिंग लावायला पाहिजे.