शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जून 2022 (14:10 IST)

वास्तुशास्त्रानुसार वायव्य दिशेचे महत्व

Feng shui bagua mirror vastu
वास्तुशास्त्रानुसार वायव्य दिशेचे महत्व आणि टिप्स
वायव्य (इंग्रजी: नॉर्थ-वेस्ट) ही एक दिशा आहे. उत्तर आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी वाऱ्याच्या दिशेचे स्थान आहे. या दिशेचा देव वायुदेव असून या दिशेत वायु तत्वाचे प्राबल्य आहे.

या दिशेला इंग्रजीत एरियल अँगल असेही म्हणतात. त्याच्या नावाप्रमाणे, या दिशेचा मूळ घटक हवा आहे.

चंद्र उत्तर-पश्चिम म्हणजेच वायव्य दिशेचा कारक आहे आणि वायू ही या दिशेची देवता आहे. जर चंद्राचा प्रभाव शुभ असेल तर घरात नेहमी सुख- समृद्धी राहते.

जर चंद्र अशुभ फल देत असेल तर घरात नेहमी मानसिक तणाव राहतो. हा वास्तुदोष दूर करण्यासाठी एका खोल भांड्यात पाण्याने भरून त्यात फुले टाकावीत. ही फुले व पाणी रोज बदलले पाहिजे. वास्तुशास्त्र सांगते की दूध दान केल्याने हा दोषही दूर होतो.