शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

रस्त्यावरही शुभाशुभ अवलंबून

कोणत्याही जमिनीची अनुकूलता तसेच प्रतिकूलता त्या जमिनीला लागून असणार्‍या रस्त्यावरही अवलंबून असते. जमीन विकत घेताना त्याच्या आजूबाजूच्या रस्त्याचाही विचार करायला हवा. जमिनीच्या कसे रस्ते हवेत हे ही समजून घ्यायला हवे. 

* ज्या जमिनीच्या चारही बाजूंनी रस्ते आहेत अशी जमीन सर्वोत्तम.
* जमिनीच्या तिन्ही बाजूला समांतर रस्ते असणेही शुभ असते.
* ज्या जमिनीच्या पश्चिम व दक्षिण दिशेला रस्ता आहे त्या जमिनीवर बांधलेल्या घरात राहणार्‍या लोकांना अधिकार व धन दोन्ही प्राप्त होते. असा भूखंड व्यापारी वर्गासाठी शुभ असतो.
* उत्तर व पश्चिम दिशेला समांतर रस्ता असणेही शुभ मानले जाते.
* कोणत्याही जमिनीच्या पूर्व व उत्तरेला रस्ता असून ईशान्य कोनात गोलाकृती दोन रस्ते मिळालेले असतील तर ते अशुभ आहेत.
* कोणत्याही जमिनीच्या पूर्व व दक्षिण दिशेला आग्नेय कोनात गोलाकृती रस्ते मिळाले असतील तर अशुभ फळ मिळते.
* जमिनीच्या पूर्व व उत्तर दिशेला रस्ता असेल तर त्या घरात राहणार्‍यांना आरोग्य, संपत्ती व समृद्धी मिळते.
* जमिनीच्या दक्षिणेला रस्ता आणि नैऋत्य कोन 90 अंशापेक्षा जास्त असल्यास असा प्लॉट अशुभ असतो.
* ज्या जमिनीच्या चारी कोपर्‍यांवर दक्षिणोत्तर ध्रुव असतो तेथे राहणार्‍याला यशःप्राप्ती होत नाही.

विथीशुला :-
म्हणजे असा रस्ता जो सरळ घरापर्यंत येऊन संपतो. असा रस्ता काही ठिकाणी शुभ व काही ठिकाणी अशुभ असतो.

शुभ विथीशुला :-
* उत्तरेकडून ईशान्य कोपर्‍यावर
* पश्चिमेकडून वायव्य कोपर्‍यात होणारी विथीशुला
* दक्षिणेकडून आग्नेय कोपर्‍यावर

अशुभ विथीशुला :-
* उत्तरेला वायव्य कोपर्‍यात
* पश्चिमेकडून नैऋत्येला
* दक्षिणेकडून नैऋत्येला
* पूर्वेकडून आग्नेयेला