मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

वास्तुची जागा आणि झाडे

भारतीय संस्कृतीत झाडांचे वेगळे महत्त्व आहे. आयुर्वेदाचे जनक महर्षी चरक यांनीसुद्धा वातावरणाच्या शुद्धतेसाठी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ज्या जागी तुळशीचे रोप असेल तेथे घर बांधणे केव्हाही उत्तम. कारण तुळस आपल्या चारी बाजूचे 50 मीटरपर्यंतचे वातावरण शुद्ध ठेवते. शास्त्रातही हे रोप फारच पवित्र मानण्यात आले आहे. 

काटेरी वृक्ष घराच्या जवळ असल्याने शत्रूभय असते. दुधाळू वृक्ष जवळ असल्याने पैसा खूप खर्च होतो. फळदार वृक्ष घराच्या जवळ असल्याने संततीला त्रास होतो. त्यामुळे काटेरी वृक्ष तोडून त्या जागी अशोक किंवा शमीचे झाड लावल्याने वर दिलेले दोष लागत नाहीत.

* आंबा, कडूनिंब, बेहेडा वा काटेरी वृक्ष तसेच पिंपळ, अगस्त, चिंच ही झाडे घराजवळ असणे चांगले नसते.

* घर बांधणीच्या आधी हे बघितले पाहिजे, की जमिनीवर झाड, गवत, वेल किंवा काटेदार वृक्ष नाही ना?

* ज्या जमिनीवर पपई, आवळा, पेरू, डाळिंब, पलाश इत्यादी वृक्ष जास्त प्रमाणात असतात, ती जागा वास्तुशास्त्रात चांगली मानली जाते.

* ज्या वृक्षांवर फुलं येतात आणि वेल व वनस्पती सरळ वाढत जाते ती जमीनसुद्धा वास्तुशास्त्रात चांगली मानली गेली आहे.

* ज्या जमिनीवर काटेदार वृक्ष, वाळलेले गवत, बोरचे झाड असते ती जागा वास्तूशास्त्राच्या दृष्टीने निषिद्ध आहे.

* पिंपळ किंवा वडाची झाडे असलेल्या जमिनीवर कधीही घर बांधू नये. सुख लागत नाही.

* सीताफळाचे झाड असलेल्या जागेवर किंवा जवळसुद्धा घर बांधू नये. कारण सीताफळाच्या झाडांवर नेहमी विषारी जीव-जंतू राहतात, असे मानले जाते.