सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By चंद्रशेखर रोकडे|

फ्लॅटस्‌ संबंधीत वास्तुनियम

वाढती लोकसंखया आणि जागेच्या अभावामुळे फ्लॅटस्‌ स्कीमची आवश्यकता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकाच बिल्डींगमध्ये अनेक फ्लॅटस्‌ असल्या कारणाने प्रत्येक फ्लॅटची आंतरीक आणि बाहेरील रचना वास्तुशास्त्रानुसार राहत नाही. काही बिल्डर स्वतःच्या फायद्याकरीता वास्तुशास्त्राच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन फ्लॅटस्‌ निर्माण करतात आणि परिणाम स्वरुप फ्लॅटस्‌ धारकांना दुःख, त्रास, शरीरासंबंधी रोग, मानसीक त्रास, कलह इत्यादींना बळी पडावे लागते. परंतु जर आपण वास्तुशास्त्राचे नियम लक्षात ठेवून फ्लॅट खरेदी केला तर नक्कीच आपण आपल्या स्वतःच्या घराचा आनंद घेवू शकतो.

फ्लॅट खरेदी करण्या अगोदर खाली दिलेल्या नियमाप्रमाणे फ्लॅट आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी.

फ्लॅटचे मुखयदार हे दक्षिण-आग्नेय, दक्षिण अथवा नैऋत्य दिशेला उघडणारे असल्यास तो फ्लॅट खरेदी करु नये. पण जर असा फ्लॅट खरेदी केला असेल तर मुखयदार हे फार कमी वेळेकरीता उघडावे. तसेच अष्टकोनी आरसा मुख्यदारावर लावावा. नाहीतर या दिशेने येणारी अशुभ किरणे घरातील वातावरणाला दुषीत करेल आणि घरातील सर्व व्यक्तींना मानसीक त्रास होऊ शकतो.

आग्नेय, दक्षिण, नैऋत्य दिशेलाच जर खिडकी असेल तर असा फ्लॅट खरेदी करु नये. पण जर असा फ्लॅट आपला असल्यास उत्तर दिशेच्या भींतीवर आरसा लावावा, नाहीतर घरात आग लागणे, चोरी किंवा नेहमी तब्येत खराब राहणे अशा घटनांना सामोरे जावे लागते.
WD
ज्या फ्लॅट मध्ये टॉयलेट आणि किचन ईशान्य कोपयात असेल तर असा फ्लॅट खरेदी करु नये. जर का आपण राहत असाल तर वास्तु नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. नाहीतर मोठ्या अप्रिय घटनांना तोंड द्यावे लागेल.

फ्लॅटचा ईशान्य कोन कटलेला असेल असा फ्लॅट खरेदी करु नफा, जर असं असल्यास त्या फ्लॅटमध्ये राहू नये कारण यामुळे घरातील कर्ता व्यक्ती कितीही चांगल्या विचारांचा असो वेळ त्याला साथ देणार नाही आणि घरातील इतर व्यक्तींना डोक्या संबंधीत त्रास होण्याची शक्यता राहील.

ज्या फ्लॅटला पूर्व, उत्तर, दिशेला खिडकी, गॅलरी असतात असे फ्लॅट शभ असतात. कारण पूर्व व उत्तर दिशेकडून सूर्यकिरणाद्वारे शुभ किरणे भरपूर प्रमाणात घरात येत असल्यामुळे सगळे सुखी आणि निरोगी राहतात.

फ्लॅट हा नेहमी आयाताकार किंवा चौरस असावा. जर तसा नसेल आणि तुम्ही तिथे राहत असाल तर वास्तुएक्सपर्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

फ्लॅट मध्ये सौम्य रंगाचाच वापर करावा.

WD
पूर्व आणि पश्चिम दिशेला खिडक्या असतील असा फ्लॅट खरेदी करु शकता तसेच राहता देखील येईल.

ज्या फ्लॅटला कोपरे नसेल असा फ्लॅट खरेदी करु नये.

फ्लॅटच्या आत आणि बाहेरील दक्षिण भागात पाण्याचा हौद असेल तर असा फ्लॅट खरेदी करु नये. पण जर अशा फ्लॅट मध्ये राहत असाल तर उत्तर दिशेला आतुन किंवा बाहेरील भिंतीला पाण्याचा साठा करावा. अन्यथा घरातील व्यक्तींना मोठ्या आजाराला तोंड द्यावे लागेल.

फ्लॅटच्या जवळ हॉस्पीटल, मंदीर, श्मशानघाट असेल तर असे फ्लॅट घेऊ नये.

फ्लॅटच्या ईशान्य कोपर्‍यात इलेक्ट्रीक बोर्ड नसेल किंवा फ्लॅटच्या ईशान्य भिंतीला इलेक्ट्रीक मिटर नसावे. अन्यथा घरात अशांती निर्माण होईल.

WD
नैऋत्य किंवा आग्नेय कोपर्‍यात स्नानगृह असलेले फ्लॅट खरेदी करु नये. जर निवास करत असाल तर तिथे पाण्याचा संचय करु नये.

फ्लॅटमध्ये सामान ठेवण्याकरीता असणारे सज्जे फक्त उत्तर किंवा पुर्व दिशेला नसावे.

फ्लॅटचे मुखयदार इतर दारापेक्षा मोठे असावे. कारण त्यामुळे घरातील सदस्यामध्ये स्थिरता राहील.

फ्लॅटच्या मुख्य दारावरती व्हेंटीलेटर असणारे फ्लॅट खरेदी करणे शुभ असते कारण रुम मध्ये जमा होणारा कार्बनडाय-ऑक्साईड, दुषित हवा बाहेर निघायला मदत मिळते.

WD
फ्लॅट मधील टॉयलेट, बाथरुमला व्हेंटीलेटर असणे आवश्यक आहे अन्यथा असा फ्लॅट खरेदी करु नये.

फ्लॅट मधील वॉटर टँक आणि बाहेरील ओव्हर हेड टँक आग्नेय कोपर्‍यात नाही याची खात्री करुनच फ्लॅट खरेदी करावा.

फ्लॅट मधील रॅक या दक्षिण किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीलाच असतील असेच फ्लॅट खरेदी करावे कारण वास्तुशास्त्रानुसार दक्षिण आणि पश्चिम दिशा ही नेहमी भारी असावी लागते.

फ्लॅट खरेदी करते वेळी वास्तु-एस्कपर्टचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे, नाहीतर धनव्यया सोबत सुखी जीवन हे अंधारमय होण्यास वेळ लागणार नाही.