शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

गायीद्वारे करा वास्तुदोष दूर

ज्या जमिनीवर वास्तु बांधायची असेल तेथे वासरू असलेली गाय बांधून ठेवली तर वास्तुदोष दूर होऊन बांधकाम निर्विघ्नरीत्या पार पडते.

वास्तुग्रंथ 'मयमतम' मध्ये यासंदर्भात विवरण दिले आहे. वास्तु बांधण्याअगोदर त्या जागेवर सवत्सा किंवा वासरू असलेल्या गायीला बांधावे. ती आपल्या वासराचे लाड करते तेव्हा तिचा फेस जमिनीवर पडून त्या जागेला पवित्र करतो. त्या जागेवर असलेल्या दोषांना दूर करतो. महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये असे सांगण्यात आले आहे, की गाय जेथे बसून निर्भयतेने श्वास घेते, त्या जागेची सर्व पापे ती ओढून काढते -

निविष्ट गोकुलं यत्र श्वांस मुंचतिनिर्भयम्।
विराजय ति तं देश पापं चास्याप कर्षति।।

ज्या घरात गायीची सेवा होते, तेथे पुत्र पौत्र, धन, विद्या सुख ह्या सर्व इच्छा पूर्ण होतात. गाय घरात पाळणे फारच शुभ असते. अशा घरात सर्व कष्ट दूर होतात. मुलांमध्ये भीती राहत नाही.

पद्म पुराण व कर्म पुराणात गायीला कधीही ओलांडून जाऊ नये, असे म्हटले आहे. कुठल्याही मुलाखतीपूर्वी, उच्च अधिकार्‍यांना भेटायला जाण्याअगोदर गायीच्या रंवंथ करण्याचा, हम्मा म्हटल्याचा आवाज कानात पडणे शुभ असते. मुलाबाळांच्या यशासाठी गायीची सेवा करणे एक चांगला उपाय आहे. गो सेवा आणि गोदान केल्याने मृत्यूची भीती राहत नाही.