शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

लग्न करताय? मग इकडे लक्ष द्या

गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वी केला जाणारा संस्कार म्हणजे विवाहसंस्कार होय. याला 16 संस्कारात स्थान दले आहे. याचा मुख्य उद्देश्य 'जीवनाला संयमाने बांधून अपत्यसुख प्राप्ती करून जीवनातल्या सगळ्या ऋणांपासून मुक्त होण्यासाठी व मोक्षासाठी कर्म करावे', हा आहे.

यासाठीच लग्नासंबंधी काही नियम बनवले गेले आहेत. ते असेः
1. वधू व वर सगोत्रीय (एका गोत्राचे) नकोत.
2. वधूचे गोत्र व मुलाच्या (वराच्या) आजोळचे गोत्रही एक नको (इथे कुळ ही संकल्पना अपेक्षित आहे).
3. दोन सख्ख्या बहिणींचा विवाह सख्ख्या भावांशी करणेही शास्त्राने निषिद्ध मानले आहे.
4. दोन भावांच्या दोन बहिणींच्या किंवा बहीण भावांच्या लग्नात 6 महिन्यांचे अंतर असावे (एका मांडवात 2 सगोत्रीय विवाह नकोत).
5. घरात विवाहानंतर 6 महिन्यांच्या आत डोहाळजेवण, जावळ, मुंज या सारखी मंगलकार्ये करू नयेत. पण जर 6 महिन्यात संवत्सर बदलत असेल तर कार्य केले जाऊ शकते.
6. लग्न किंवा इतर मंगलकार्यात श्राद्धादी कर्मे करू नयेत असे शास्त्र सांगते.
7. जर ग्रहमुख (ग्रहयज्ञ) झाल्यावर वधू किंवा वराच्या घरात कोणाचा मृत्यू झाल्यास वधुवर व त्यांचे मातापिता यांना सुतक लागत नाही. तसेच ठरलेल्या तिथीला लग्न केले जाऊ शकते.
8. वाङनिश्चय किंवा साखरपुड्यानंतर परिवारात कोणाचा मृत्यू झाल्यास सुतक संपल्यावर किंवा सव्वा महिन्यानंतर लग्न करण्यास कोणताही दोष नाही.