रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जानेवारी 2019 (00:04 IST)

वास्तुनुसार ग्रहांचा स्वभाव व प्रभाव

सूर्य - पुरुष जातीचा, रक्त वर्ण, पित्त प्रकृतीचा, पूर्वेचा स्वामी. हा आत्मा, आरोग्य, स्वभाव, राज्य यांचा सूचक व जनक आहे. याच्याद्वारे शरीरातील अपचन, अतिसार मंदाग्नी, डोकेदुखी, क्षय, मानसिक रोग, डोळ्यांचे विकार, नैराश्य, अपमान व भांडणाचे विचार केले जातात. मणका, स्नायू, काळीज, डोळे या अवयांवर याचा प्रभाव आहे. याच्याकडून वडिलांच्या बाबतीत विचार केला जातो. सूर्य लग्नाच्या सातव्या स्थानात बळी तर मकर राशीपासून सहाव्या राशीपर्यंत चेष्टाबली मानले जाते सूर्याला तापग्रह म्हटले जाते.
 
चंद्र - स्त्री जातीचा, पांढरा रंगाचा, जलीय म्हणजेच वायव्य दिशेचा स्वामी आहे. हा मन, संपत्ती, चित्त वृत्ती शारीरिक स्वास्थ, राजकीय अनुग्रह, माता-पिता तसेच जलोदर, मूत्राचे विकार, मानसिक रोगाला स्त्री रोग, निरर्थक फिरणे, पोट तसेच डोक्यासंबंधी विचार केला जातो. हा रक्ताचा स्वामी असून वातश्लेजा याचा धातू आहे. चंद्र लग्नी 4 थ्या स्थानापासून बळी तर मकर राशीपासून सहा राशीत वक्री होतो. कृष्ण पक्षाच्या षष्ठी पासून शुक्ल पक्षाच्या दशमी पर्यंत हा क्षीण असतो या अवधीत त्याला पापग्रह म्हणतात. शुक्ल पक्षाच्या दशमीपासून कृष्ण पक्षाच्या पंचमीपर्यंत हा क्षीण असतो या अवधीत त्याला पापग्रह म्हणतात. शुक्ल पक्षाच्या दशमीपासून कृष्ण पक्षाच्या पंचमीपर्यंत तो तेजस्वी असतो तेव्हा त्याला शुभ ग्रह म्हणतात. पूर्ण चंद्रच आपल्या चवथ्या स्थानात पूर्ण फळ देतो. (क्षीण चंद्र नाही).
 
मंगळ - हा पुरुष जातीचा, रक्त वर्णी, दक्षिणेचा स्वामी, अग्नी तत्वाचा तसाच पित्त प्रवृत्तीचा कारक व नियामक आहे. ज्योतिषशास्त्रात याला पापग्रह मानले आहे. हा उत्तेजित करणारा, तृष्णाकारक, तसेच दुःख:दायक आहे. मंगळ तिसर्‍या व सहाव्या स्थानी लाभदाक तर दहाव्या स्थानी संमिश्र फळ देणारा व चंद्राबरोबर वक्री तसेच दुसर्‍या स्थानी निष्फळ व बलहीन असतो.
 
बुध - हा नपुंसक जातीचा, काळसर वर्णाचा उत्तरेचा स्वामी, त्रिदोष प्रकृती तसेच पृथ्वीतत्वाचा आहे. हा ज्योतिष वैधकी, कला, शिल्पकला, कायदा, व्यवसाय, चवथ्या व 10व्या स्थानांचा कारक आहे. गुप्त रोग, ‍अतिसार, वातरोग कोड, मुकेपणा, वृद्धाश्रम, ‍‍विवेक, शक्ती जीभ तसेच शब्द बोलण्याच्या संबंधीत अवयवांचा विचार केला जातो. बुध, सुर्य, मंगळ, राहू, केतू तसेच शनी जे अशुभ ग्रह आहेत ते बरोबर असतील (युती) तर अशुभ फळे मिळतात. आणि पूर्णचंद्र, गुरु, शुक्र ह्या ग्रहांबरोबर शुभ फळ मिळते. जर बुध चवथ्या स्थानात असेल तर निष्फळ होतो. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ज्याच्याबरोबर असेल तसे फळ देतो. एकटा असताना तो शुभ ग्रह आहे. 
 
गुरु - हा ग्रह पुरुष जाती, पीतवर्ण ईशान्येचा स्वामी, तसेच आकाशतत्वाचा आहे. हा कफ व चरबीची वृद्धी करतो. ह्याच्या साहाय्याने शोध, सृजन हे रोग, घर विद्या, पुत्र पौत्र आदी गोष्टींचा विचार केला जातो. हा हृदयाच्या शक्तीचा कारक ही मानला जातो. गुरु लग्नी असेल तर बली असतो पण चंद्राबरोबर कुठे असेल तर तो वक्री होतो. हा शुभ ग्रह आहे, ह्याद्वारे पारलौकिक आणि आध्यात्मिक सुखांचा विशेष विचार केला जातो.
 
शुक्र - हा ग्रह स्त्री जाती, श्याम गौर वर्ण, आग्नेयेचा स्वामी कार्य कुशल तसेच जलीय तत्त्वाचा आहे. हा कफ वीर्य या धातूंचा कारक म्हटला जातो. याच्या प्रभावामुळे शरीराचा रंग गहुवर्णीय होतो. हा काव्य, संगीत, वस्त्राभूषण, वाहन, शैय्या, पुष्प, डोळे, स्त्री, पत्नी तसेच कामेच्छाकारक आहे. याच्याद्वारे चतुरपणा आणि सांसारिक सुखासंबंधी विचार केला जातो. जर व्यक्तीचा जन्म दिवसा झाला असेल तर शुक्राच्या मदतीने आईशी असणार्‍या संबंधांचाही विचार केला जातो. हा सहाव्या स्थानी निष्‍फळ होतो. जर सातव्या स्थानी असेल तर ‍अनिष्ट फळ देतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला शुभ ग्रह मानले आहे. याद्वारे सांसारिक व व्यावहारिक सुखाचा विचार केला जातो. 
 
शनी : हा ग्रह नपुंसक जातीचा, कृष्ण वर्णीय पश्चिमेचा स्वामी, वायुतत्वाचा व वातश्लेष्मीक प्रकृतीचा आहे. याद्वारे आयुष्य, शारीरिक बल, निश्चय, संकट, मोक्ष, यश, ऐश्वर्य, नोकरी, योगाभ्यास विदेशी भाषा, आणि मूर्च्छा या रोगांचा विचार केला जातो. जर व्यक्तीचा जन्म रात्री झाला असेल तर तो आई वडिलांना कारक आहे. शनी सातव्या स्थानी बली आहे. पण वक्री-ग्रह किंवा चंद्र यांच्या जोडीने तो वक्री होतो. शनी क्रूर तसेच पापग्रह आहे. पण अंतिम परिणाम सुखद होतो. हा माणसाला दुर्भाग्य, संकट आणि फेर्‍यात अडकवून शेवटी त्याला शुद्ध आणि सात्त्विक बनवतो.
 
राहू - हा काळ्या रंगाचा, क्रूर ग्रह आहे हा ज्या स्थानी बसतो तेथील प्रगती तो थांबवतो, हा गुप्त युक्तीबल कष्ट तसेच त्रुटी दर्शवतो. 
 
केतू - हाही काळ्या रंगाचा, क्रूर ग्रह आहे. याच्याद्वारे नाक, हात, पाय, भूकेसारखे कष्ट, तसेच चर्मरोग आदी गोष्टींचा विचार केला जातो. हा गुप्त शक्ती, ताकद, कठिण कार्य, भीती तसेच कमतरतेचा कारक आहे. काही स्थितीत केतू शुभ ग्रह मानला जातो.