मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 12 जानेवारी 2019 (13:03 IST)

वास्तू उपाय- हे 4 काम तुम्हाला बनवू शकतात भाग्यशाली

प्रत्येक व्यक्तीला भाग्यशाली बनायचे असते, पण बर्‍याच वेळा मेहनत करून देखील त्याचे भाग्य उदय होत नाही. जर तुमच्यासोबत देखील असेच होत असेल तर हा त्रास दूर करण्यासाठी ह्या 4 गोष्टी तुमची मदत करू शकतात.  
 
भाग्यशाली बनण्यासाठी लक्षात ठेवा या 4 गोष्टी  -
 
1. मेन गेटजवळ ठेवा झाड रोपटे  
 
घर किंवा दुकानाच्या मेन गेटमधूनच बर्‍याच प्रकारची एनर्जी प्रवेश करते. नेगेटिव्ह अॅनर्जी थांबवण्यासाठी आणि पॉझिटिव्ह अॅनर्जी वाढवण्यासाठी घर किंवा दुकानाच्या मेन गेटजवळ सुंदर आणि सुगंधित पौधे लावावे. लक्षात ठेवा की झाड काटेदार किंवा टोकदार नको, असे पौधे निगेटिव्हीटी वाढवतात.   
 
2. हिंसा दर्शवणारे फोटो लावू नये -
 
घर किंवा दुकानात कधीपण हिंसा दाखवणारे फोटो लावू नये. खास करून घर किंवा दुकानाच्या दक्षिण पश्चिम दिशेत तर बिलकुलच नाही. कारण हा कोपरा नात्याशी संबंधित असतो. म्हणून, त्रास दूर करून, भाग्योदयासाठी हिंसक दृश्य किंवा हिंसक जनावरांचे फोटो घर किंवा दुकानात लावू नये.  
 
3. तिजोरी किंवा गल्ल्यात लावा आरसा -
 
आपल्या घरात किंवा दुकानाच्या तिजोरीत किंवा गल्ल्यात खाली आणि वरच्या दिशेने आरसा लावावा. असे करणे फारच शुभ असत. यामुळे मिळकत चांगली होते आणि पैशांचा प्रभाव वाढतो. तसेच गल्ल्यात चांदी सोन्याचे नाणे ठेवणे देखील चांगले असते.  
4. दूर करावा पार्‍यांशी संबंधित दोष-
 
बर्‍याच वेळा घर किंवा दुकानात असणार्‍या पायर्‍या देखील तुमच्या त्रासाचे कारण बनू शकतात. सरळ पायर्‍या चांगल्या नाही मानल्या जातात, त्याच्या जागेवर वाकड्या किंवा घुमावदार पायर्‍या भाग्यशाली असतात. जर तुमच्या घरात किंवा दुकानात सरळ पायर्‍या असतील तर त्याच्या खाली सहा रॉड असणारे विंड चाइम लावून द्या. असे केल्याने पायर्‍यांशी संबंधित वास्तू दोष दूर होतो.