मंगळवार, 28 मार्च 2023
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (16:46 IST)

15 August special Recipe :तीन रंगाचे तिरंगी ढोकळे

साहित्य- 
100 ग्रॅम तांदूळ, 100 ग्रॅम उडीद डाळ, दीड चमचे मीठ,  2.5 चमचे फ्रुट सॉल्ट,  3/4 कप पाणी, 125 ग्रॅम हरभरा(चणा) डाळ,125 ग्रॅम मूग डाळ, 1 चमचा हळद, चिमूटभर हिंग, 1 लिंबाचा रस, 250 ग्रॅम मटार, 6 हिरव्या मिरच्या,1आलं, 1 चमचा तेल, 1/2 किसलेल नारळ, 2 जुडी हिरवी कोथिंबीर,10-12 कडीपत्त्याची पाने,1 चमचा मोहरी ,4 मोठे चमचे तेल (फोडणी साठी).
 
कृती -
 
डाळ आणि तांदूळ वेगळे वेगळे तीन तासासाठी भिजत ठेवा.मटार,आलं,मिरच्या बारीक वाटून घ्या.मटार तेलावर परतून त्यात मीठ घाला.
तांदूळ जाडसर आणि उडीद डाळ बारीक वाटून घ्या.या मध्ये मीठ,फ्रुट सॉल्ट,पाणी मिसळा.
चणा डाळ आणि मुगाची डाळ एकत्र दरीदरीत वाटून घ्या.यामध्ये मीठ, हळद, हिंग, फ्रुट सॉल्ट,लिंबाचा रस आणि पाणी मिसळा.
 
एका ताटलीत किंवा ढोकळ्याच्या पात्रात तेल लावून मूग आणि चणाडाळीचा  ¼ इंचाचा जाडसरथर लावून 5 -7 मिनिटे वाफेवर शिजवा.ह्याला काढून यावर मटारची पेस्ट पसरवुन द्या.या वर डाळ -तांदुळाचा ¼ इंचाचा जाडसर थर पसरवून वाफेवर शिजवा.शिजल्यावर थंड होण्यासाठी ठेवा.
 
आता ह्याचे चौरस काप करा.कढईत तेल तापत ठेवा.मोहरी,मीठ,कढीपत्त्याची फोडणी तयार करून  ढोकळ्यावर पसरवून द्या.किसलेलं नारळ आणि कोथिंबीर घालून सजवून घ्या.तिरंगा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे.नारळाच्या चटणीसह सर्व्ह करा.