ganesh chaturthi
✕

घरच्या घरी बनवा बाजारासारखी कुरकुरीत भेळ

Updated: शुक्रवार, 13 मार्च 2026 (14:35 IST)
साहित्य-
मुरमुरे (भडंग)-३-४ वाट्या (कुरकुरीत केलेले)
बारीक शेव, पापडी-अर्धी वाटी
कांदा व टोमॅटो-प्रत्येकी १ मध्यम (बारीक चिरलेला)
बटाटा-१ उकडलेला (फोडी करून)
ओली चिंच-गुळाची चटणी-२-३ मोठे चमचे
तिखट हिरवी चटणी-१-२ मोठे चमचे
मसाले-चाट मसाला, लाल तिखट, मीठ  
सजावटीसाठी-कोथिंबीर, लिंबू आणि खारे दाणे
ALSO READ: मसाला पूरी चाट रेसिपी
कृती-
सर्वात आधी मुरमुरे कढईत थोडे गरम करून घ्या. त्यात चिमूटभर हळद आणि मीठ घातले तर चव अधिक खुलते. एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि उकडलेला बटाटा घ्या. त्यात हिरवी तिखट चटणी आणि चिंच-गुळाची गोड चटणी घालून व्यवस्थित मिक्स करा. आता या मिश्रणात कुरकुरीत मुरमुरे, खारे दाणे आणि पापडी चुरडून टाका. वरून चाट मसाला आणि थोडे लाल तिखट भुरभुरा.सगळ्यात शेवटी भरपूर कोथिंबीर आणि बारीक शेव घाला. खाण्यापूर्वी अर्ध्या लिंबाचा रस पिळा आणि झटपट मिक्स करून लगेच सर्व्ह करा.
ALSO READ: छोटीशी भूक भागविण्यासाठी काही मिनिटांत तयार करा दही मखाना चाट रेसिपी
खास टिप्स-
मुरमुरे मऊ पडू नयेत: चटणी आणि मुरमुरे सगळ्यात शेवटी एकत्र करा. जर आधीच मिक्स करून ठेवले तर भेळ मऊ पडते.
पाण्याचा अंश टाळा: टोमॅटोचा मधला पाण्याचा भाग काढून फक्त वरचा गर चिरून वापरला तर भेळ जास्त वेळ कुरकुरीत राहते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Chaat Recipes Without Oil तेलाशिवाय बनवा स्वादिष्ट चाट
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

दिवाळी फराळाची तयारी आधीच करायची आहे? कोणते पदार्थ किती दिवस टिकतात?

शिमला मिरची जास्त दिवस ताजी राहण्यासाठी सोप्या आणि प्रभावी टिप्स वापरा

मुलांसाठी देवी दुर्गेवरून युनिक आणि अर्थपूर्ण नावे Unique Baby Boy Names

"झणझणीत आणि पौष्टिक मोड आलेल्या ''मटकीची उसळ'' रेसिपी

Navratri Vrat Special Coconut Halwa उपवासाचा नारळ हलवा पाककृती

पुढील लेख
Show comments