1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
  4. Masala Puri Chaat Recipe

मसाला पूरी चाट रेसिपी

साहित्य- 
वीस कुरकुरी पुरी
एक कप- उकडलेले चणे 
एक कांदा चिरलेला 
एक टोमॅटो चिरलेला 
एक हिरवी मिरची चिरलेली 
अर्धा चमचा चॅट मसाला 
अर्धा चमचा जिरे पूड 
दोन मोठे चमचे चिंचेची चटणी 
दोन मोठे चमचे पुदिना चटणी 
कोथिंबीर चिरलेली  
शेव 
 
कृती-
सर्वात आधी एक प्लेट घेऊन त्यामध्ये या पुऱ्या ठेवाव्या. त्यानंतर त्यावर चणे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची घालावी. आता यामध्ये पुदिना आणि चिंचेची चटणी घालावी. व वरतून चॅट मसाला आणि जिरे पूड घालावी. तसेच शेव आणि कोथिंबीर ने गार्निश करावे. तर चला तयार आहे आपली मसाला पुरी चॅट रेसिपी.   
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 
पुढील लेख
उपवासाला चालणाऱ्या केळीच्या या तीन रेसिपी नक्की ट्राय करा