गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (08:00 IST)

कच्च्या पपईची स्वादिष्ट भाजी

साहित्य-
एक मध्यम आकाराची कच्ची पपई
दोन चमचे मोहरीचे तेल
अर्धा चमचा जिरे
1/4 चमचा हिंग
अर्धा चमचा हळद 
एक चमचा धणे पूड 
एक चमचा लाल तिखट 
अर्धा चमचा गरम मसाला 
दोन हिरव्या मिरच्या 
एक टोमॅटो बारीक चिरलेला 
अर्धा चमचा लिंबाचा रस 
चवीनुसार मीठ
कोथिंबीर 
 
कृती-
सर्वात आधी पपईचे साल काढून तिचे तुकडे करून घ्यावे. तसेच कोमट पाण्यामध्ये धुवून घ्यावे. आता कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरे आणि हिंग घालावे. त्यानंतर हळद, धणे पूड आणि तिखट घालावे. आता कापलेले टोमॅटो आणि हिरवी मिरची घालावी. तसेच टोमॅटो नरम झाल्यानंतर त्यामध्ये पपईचे तुकडे घालावे. व परतवून घ्यावे. 
 
आता पपईचे तुकडे परतवल्यानंतर त्यामध्ये मीठ घालावे. थोड्या वेळाने यामध्ये आमसूल पावडर आणि गरम मसाला घालावा. आता वरून हिरवी कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपली कच्ची पपईची भाजी रेसिपी, तुम्ही ही पराठा सोबत सर्व्ह करू शकतात.   
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik