Festival Posters
✕

Cucumber Peel Bhaji: स्वादिष्ट अशी बनणारी काकडीच्या सालीची भाजी

Updated: शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (13:55 IST)
 
साहित्य-
काकडीची साल- 1 किलो
कांदा- 1 बारीक चिरलेला 
लसूण- 1
जिरे- अर्धा चमचे 
धणे पूड- 1 चमचा 
गरम मसाला- 1/2 चमचा  
हळद- 1/2 चमचा 
तिखट- 1 चमचा 
आमसूल पावडर- 1 चमचा 
मीठ 
 
कृती-
काकडीच्या सालीची भाजी बनवण्यासाठी प्रथम त्या धुवून त्यांचे बारीक तुकडे करावे. आता एका कढईमध्ये पाणी घालून काकडीचे साल 5 मिनिट उकळण्यासाठी ठेवावे. यानंतर कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि जिरे घालावे. आता हा मसाला कांदा मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यावा. तसेच नंतर सर्व कोरडे मसाले आणि मीठ घालून मिक्स करा. आता यानंतर उकडलेल्या काकडीची साले कढईत टाका आणि मसाल्यात मिक्स करा. आता झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवा आणि नंतर गॅस बंद करा. तर चला तयार आहे आपली स्वादिष्ट काकडीच्या सालीची भाजी. जी तुम्ही पराठा आणि पोळी सोबत खाऊ शकता. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

जातक कथा : सुंदर गुलाब आणि काटे यांची हृदयस्पर्शी गोष्ट

पतीला कधीही सांगू नयेत अशा ५ गोष्टी: स्त्रियांनी ही माहिती नेहमी लक्षात ठेवावी!

रेझ्युमे पाठवूनही मुलाखतीचा कॉल येत नाही? या सामान्य चुका तपासा

पोळ्या दुसऱ्या दिवशीही मऊ राहातील, फक्त कणिक मळताना या चुका टाळा

मुलांना नाश्त्यासाठी टेस्टी आणि झटपट Avocado Toast Recipe

पुढील लेख
Show comments