शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: रविवार, 1 सप्टेंबर 2024 (07:00 IST)

उकडलेल्या हरभाऱ्यांपासून बनवा चटपटीत चणा चाट रेसिपी

Chana Chaat
सकाळी उकडलेले हरभरे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, उकडलेल्या हरभाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीनची मात्रा असते. याकरिता आपण आज उकडलेल्या हरभऱ्याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला जाणून घेऊ या चटपटीत चणा चाट रेसिपी
 
साहित्य-
एक वाटी हरभरे  
1 कांदा बारीक चिरलेला 
1 टोमॅटो बारीक चिरलेला 
अर्धी काकडी बारीक चिरलेली 
अर्धे गाजर बारीक चिरलेले 
धणे पूड 
लिंबाचा रस 
काळे मीठ 
चिमूटभर मिरे पूड 
चिरलेल्या हिरव्या मिरच्या 
 
कृती-
चटपटीत चणा चाट बनवण्यासाठी सर्वात आधी हरभरे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे, मग सकाळी भिजवलेले हरभरे पाणी काढून घ्यावे. व वाफवण्यास ठेवावे. काही वेळाने वाफवले गेलेले हरभरे एका बाऊलमध्ये काढावे. आता त्यामध्ये सर्व भाज्या म्हणजे कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर या हरभऱ्या मध्ये घालून मिक्स करा. आता चिरलेली मिरची, मीठ, चिमूटभर काळी मिरी पूड घालून एका लिंबाचा रस पिळून घ्या. तसेच हे मिश्रण देखील चांगले मिक्स करा. तर चला तयार आहे आपला चटपटा चना चाट.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik