पावसाळ्यात बनवा स्वादिष्ट कुरकुरीत कॉर्न पकोडे
पावसाळ्यात काहीतरी चटपटीत, कुरकुरीत खावे असे प्रत्येकाला वाटते. कॉर्न पकोडे हा एका चांगला आणि आरोग्यदायी नाश्ता आहे. तसेच यामध्ये फाइबर, विटामिन आणि अँटीऑक्सीडेंटचे प्रमाण भरपूर आहे. तर चला जाणून घेऊन या स्वादिष्ट कुरकुरीत कॉर्न पकोडे रेसिपी.
साहित्य-
1 कप ताजे कॉर्न कर्नल
1 छोटा कांदा बारीक चिरलेला
3 हिरव्या मिरच्या चिरलेल्या
1/4 कप बेसन
2 चमचे तांदळाचे पीठ
1/2 चमचे जिरे
1/2 चमचे लाल तिखट
1/4 चमचा हळद पावडर
चिमूटभर हिंग
चवीनुसार मीठ
चिरलेली ताजी कोथिंबीर
तळण्यासाठी तेल
कृती-
सर्वात आधी बाऊलमध्ये कॉर्न दाणे, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, जिरे, तिखट, हळद, कोथिंबीर, हिंग आणि मीठ मिक्स करावे. आता या मिश्रणात बेसन आणि तांदळाचे पीठ घालावे. व हे चांगल्या प्रकारे मिक्स करावे. आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे. आता गरम तेलात पकोडे सोडावे व तळावे. सर्व बाजूंनी सोनेरी रंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. आता गरमागरम कॉर्न पकोडे पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik