मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

चविष्ट चिली गार्लिक पराठा रेसिपी

Chilli Garlic Paratha
रात्रीच्या जेवणात गरमागरम पराठे खायला सर्वांनाच आवडतात. सामान्यतः भारतात, पराठे बनवले जातात आणि बहुतेक वेळा नाश्त्यात खाल्ले पण जातात. तुम्हालाही पराठे ख्याल आवडत असेल चिली गार्लिक पराठा नक्की ट्राय करा. तर चला जाणून घ्या रेसिपी.
 
साहित्य-
पीठ
लसूण पाकळ्या
सुकी लाल मिरची
चीज 
चवीनुसार मीठ
 
कृती-
चिली गार्लिक पराठा बनवण्यासाठी आधी बाऊलमध्ये पीठ घेऊन त्यामध्ये मीठ घालावे. व पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यावर थोडा वेळ सुती कापडात गुंडाळून ठेवावे. आता एका बाऊलमध्ये चीज किसून ठेवावे. लसूण आणि लाल मिरची एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. आता कणकेचा गोळा घेऊन पोळी लाटून घ्या. त्याचप्रमाणे दुसरी पोळी लाटून पहिल्या पोळीपेक्षा थोडी लहान ठेवा. चमच्याने पहिल्या पोळीला मिरची आणि लसूण पेस्ट लावा. तुम्हाला लसणाची जितकी चव हवी तितकी पेस्ट तुम्ही लावू शकता. त्यावर थोडे किसलेले चीज पसरवा आणि त्यात घाला. तसेच आता या पोळीवर दुसरी पोळी ठेवावी.  लोणी लावून दोन्ही बाजूंनी पराठा मंद आचेवर शिजवा. तर चला तयार आहे आपला चिली गार्लिक पराठा. तुमच्या आवडीच्या चटणी आणि सॉससोबत सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik