मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (06:36 IST)

पौष्टिकतेने भरपूर ज्वारीचा उपमा कसा बनवावा, रेसिपी लक्षात घ्या

jvar upma
उपमा एक आरोग्यादायी नाश्ता आहे. तुम्हाला देखील नाश्तामध्ये आरोग्यदायी उपमा खायचा असेल तर नक्की ट्राय करा ज्वारीचा उपमा. ज्वारीला पोषणाचा खजाना मानले जाते, यामध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, पोटॅशियम आणि आयरन असतात. यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते.  
 
साहित्य-
अर्धा कप ज्वारी 
तेल 
मोहरी 
जिरे 
हिंग 
कढीपत्ता
बारीक चिरलेला कांदा
हिरवी मिरची
टोमॅटो 
शिमला मिरची 
गाजर 
कोबी 
काळी मिरी
मीठ
धणेपूड 
हळद
 
कृती-
ज्वारीचा उपमा बनवण्यासाठी अर्धा कप ज्वारी चांगली धुवून घ्यावी. व रात्रभर भिजत ठेवावी. दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये एक कप पाणी आणि ज्वारी घालून 6-7 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. आता कढईत तेल टाकून त्यात मोहरी, जिरे आणि हिंग घालावे. तसेच कढीपत्ता आणि आले देखील घालावे. एक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. नंतर हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून परतून घ्या. आता बीन्स, सिमला मिरची, गाजर आणि कोबी घालून तळून घ्या. नंतर काळी मिरी, मीठ, धनेपूड आणि हळद घालून परतून घ्या. आता त्यात उकडलेली ज्वारी घालून मिक्स करून परत एकदा झाकण ठेवून शिजू द्या. तर चला आपला  ज्वारी उपमा तयार आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik