गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

Beetroot Raita आरोग्यसाठी फायदेशीर आहे बीटाचा रायता

Beetroot Raita
रायता हा पदार्थ सर्वांचा आवडता आहे. रायत हे जेवणाची चव वाढवत असत. तसेच बीटाचा रायता देखील आरोग्यासाठी फायदेशीर असते. तर आज आपण पाहणार आहोत पोषक तत्वांनी भरपूर असे बीटाचा रायता. तर चला लिहून घ्या रेसिपी.
 
साहित्य-
2 कापलेले बीट 
3/4 लाल तिखट 
3/4 चमचे जिरे पूड 
3 कप दही  
2 पुदिन्याचे पाने 
मीठ चवीनुसार 
 
कृती-
सर्वात आधी बीटाला स्टीम करून व शिजवून घ्या. यानंतर बीटाचे साल काढून व बारीक चिरून बाजूला ठेऊन द्या. यानंतर बाऊलमध्ये दही घ्या. यामध्ये जिरे पूड, लाल तिखट आणि मीठ घालावे. आता हे मिश्रण चांगल्याप्रकारे मिक्स करावे. आता या मिश्रणामध्ये बीटाचे तुकडे घालावे. व छान मिक्स करून फ्रिजमध्ये काही वेळ ठेऊन द्यावे. याला गुलाबी कलर येईल. तसेच पुदिना पाने व कोथिंबीर घालून सजवावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik