या पौष्टिक ड्रायफ्रूट पासून बनवा रायते, जाणून घ्या रेसिपी
तुम्ही कधी माखण्याचे रायते खाल्ले आहे का? तर आज आम्ही तुम्हाला सांगू कसे बनवावे, माखण्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्वे असतात. जसेकी, कॅल्शियम, मॅग्नाशीयम आणि अँटीऑक्सीडेंट असतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतात. माखण्याचे रायते खाल्यास अनेक प्रकारचे पोषकतवे शरीराला मिळतात. तर चला रेसिपी जाणून घ्या.
साहित्य-
माखणे
दही
कढीपत्ता
हिरवी मिरची
मीठ चवीनुसार
जिरे
तूप
तेल
कृती-
मखाने रायता बनवण्यासाठी सर्वात आधी हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात. यानंतर, दही फेटून ते पातळ करावे. आता दह्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे. तसेच कढईत तूप घालून मखाने परतून घ्या. यानंतर रायतेसाठी फोडणी तयार करू. कढईत तेल टाकून गरम करायला ठेवा. नंतर तेलात जिरे आणि कढीपत्ता घालावा. काही वेळाने गॅस बंद करावा. आता दह्यामध्ये मुखाने घालून मिक्स करावे. यानंतर तयार फोडणी, आणि मिरची घालून मिक्स करावे. तर चला स्वादिष्ट मखना रायता तयार आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik