शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (06:36 IST)

Namkeen recipe : मसालेदार चणा डाळ

chana dal
चणा डाळ चटपटीत हे एक असे स्नॅक आहे जे लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. तसेच ही मसालेलदार चटपटीट चणा डाळ तुम्ही घरी देखील बनवू शकतात. तर चला जाऊन घ्या रेसिपी. 
 
साहित्य-
1 वाटी चना डाळ रात्रभर भिजत टाकलेली 
1/2 चमचा हळद  
1/2 चमचा तिखट
1/2 चमचा चाट मसाला
1/4 चमचा काळे मीठ
1/2 चमचा जिरे पूड 
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
 
 
सर्वात आधी चणा डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवावी. मग सकाळी पाणी काढून सुती कापडावर पसरवून वाळवावी. आता कढईत तेल गरम करावे. आता डाळ तेलात टाकून कुरकुरीत होइसपर्यंत टाळून घ्या. डाळ चांगली तळल्यावर ती बाहेर काढून टिश्यू पेपरवर ठेवावी म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल. आता तळलेली डाळ एका मोठ्या भांड्यात ठेवा आणि त्यात हळद, तिखट, चाट मसाला, काळे मीठ, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालावे. मसाले चांगले मिक्स करावे जेणेकरून ते डाळीला चांगले चिकटतील. मसालेदार चणाडाळ पूर्णपणे थंड होऊ द्या. व हवाबंद डब्यात ठेवावी. हे नमकीन बरेच दिवस ताजे राहते आणि तुम्ही ते कधीही खाऊ शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik