गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

मेतकूट

सामुग्री: पावभर चणाडाळ, 50 ग्रॅम उडीद डाळ, मूठभर तांदूळ, 10 लाल सुक्या मिरच्या, अर्धा इंच सुंठेचा तुकडा, 1 चमचा हळद, मोहरी, जीरे, 1 चमचा हिंग
 
कृती: चणा डाळ, उडीद डाळ, तांदूळ, मोहरी, जीरे हे पदार्थ वेगवेगळे भाजावे. मिरच्या गरम असलेल्या कढईत ठेवाव्या. मग सुंठेचा तुकडा बारीक करून हळद व हिंगासकट सर्व पदार्थ एकत्र मिक्सरमध्ये बारीक दळावे. दळल्यावर पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावे व कंटेनरमध्ये भरून ठेवावे.