1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (13:32 IST)

घरच्या घरी बनवा चविष्ट चमचमीत शेव पुरी

sev puri
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाहेर जाऊन खाणं शक्य नाही. पण कधी काळी काही चमचमीत किंवा चविष्ट खावेसे वाटतं. भेळ पुरी, पाणीपुरी, शेव बटाटा पुरी, शेव पुरी हे तर सर्वानाच अगदी मनापासून आवडणाऱ्या गोष्टी आहे. यांचा तर विचार करूनच तोंडाला पाणी येतं. पण सध्याच्या कोरोनाच्या काळात इच्छा असून देखील बाहेर जाऊन खावेसे वाटत नाही. त्यासाठी आपण हे घरच्या घरीच बनवून खाऊ शकता. आरोग्याच्या दृष्टीने देखील हे चांगले राहील. चला तर मग आज आम्ही आपल्याला चविष्ट शेव पुरी बनविण्याची रेसिपी सांगत आहोत. 
 
साहित्य - पापडी (पुरी), उकडलेले बटाटे, हिरवी चटणी, बारीक चिरलेला कांदा, चिंचेची गोड चटणी, जिरे पूड, चाट मसाला, मीठ, बारीक शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर. 
 
कृती - 
सर्वप्रथम एका ताटलीत पापडी (पुऱ्या) रचून घ्या. त्यावर उकडून कुस्करलेला बटाटा घाला. त्या पुऱ्यांवर बारीक चिरलेला कांदा घाला. हिरव्या चटणीला पुऱ्यांवर लावा. त्यावर चिंचेची गोड चटणी घाला. त्यावर जिरेपूड, चाट मसाला, मीठ चवीप्रमाणे भुरभुरून द्या. नंतर बारीक शेव त्या पुऱ्यांवर घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. चविष्ट चमचमीत शेव पुरी खाण्यासाठी तयार.