Dharma Sangrah
✕

Tasty And Delicious Vada Pav Recipe - चविष्ट वडा पाव रेसिपी

Updated: मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (08:45 IST)
 
साहित्य: 
लादीपाव, 4मोठे बटाटे, 5 हिरव्या मिरच्या, एक चमचा आले लसूण पेस्ट, कोथिंबीर, लिंबू ,तळण्यासाठी तेल,
फोडणीचं साहित्य – 2 टिस्पून तेल, मोहरी, जिरे, चिमूटभर हिंग, हळद
आवरणासाठी – 1 कप चणाडाळीचं पिठ, आवश्यकतेनुसार पाणी, 1/2 टिस्पून हळद, चवीपुरते मीठ, चिमूटभर खायचा सोडा
 
कृती :-
बटाटे शिजवून मॅश करुन घ्यावे. गॅसवर कढई ठेवून 2 चमचे तेल गरम करुन मोहरी, जिरे, हिंग, हळद, बारीक चिरलेल्या मिरच्या, आलं -लसूण पेस्ट घालावी. नंतर त्यात बटाटा घालून मंद आचेवर परतून घ्यावं. मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावं. शेवटी थोडा लिंबूरस घालावा. भाजी थंड होण्यासाठी ठेवावी.
आवरणासाठी बेसनात मीठ, हळद, किंचित सोडा घालून भिजवून घ्यावे. 
 
थंड झाल्यावर मिश्रणाचे छोटे गोळे करावे. कढईमध्ये तेल तापून घ्यावं आणि भिजवलेल्या बेसन पिठात तयार गोळे बुडवून तेलात तळून घ्यावे. तळून झाल्यावर पाव मधोमध उभा कापून त्यामध्ये लसणाची लाल चटणी लावून आणि वडा ठेवून सर्व्ह करावे.
 
 
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

मखाना स्नॅक्स: चवदार, कुरकुरीत आणि आरोग्यासाठी वरदान!

आले त्वचा आणि केसांसाठीही वरदान आहे, फायदे जाणून घ्या

साबण आणि डिटर्जंटमुळे हातांना जळजळ होते? स्वच्छता करताना या गोष्टी लक्षात ठेवा

पीएचडी म्युझिक मध्ये करिअर बनवा, पात्रता, पगार जाणून घ्या

घरबसल्या पैसे कमवायचे आहेत, हे ४ शॉर्ट टर्म कोर्सेस शिका

पुढील लेख
Show comments