गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: बुधवार, 27 जुलै 2022 (15:04 IST)

Relationship Tips: जोडीदाराच्या कामात काही अडचण येत असेल तर त्याला अशा प्रकारे सपोर्ट करा

सुख असो वा दु:ख, ते कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात नेहमी सारखे राहत नाहीत. पर्सनल लाइफ असो वा प्रोफेशनल लाइफ, आयुष्यात चढ-उतार येतच असतात.अशा परिस्थितीत, जर तुमचा जोडीदार  करिअरच्या संकटातून जात असेल, तर भांडणे करून किंवा त्याच्यावर रागावून त्याच्या अडचणी वाढवू नका.अशा वेळी या टिप्सचा अवलंब करून, त्याची हिम्मत वाढवून त्याला आधार देऊन या वाईट टप्प्यातून बाहेर पडण्यास मदत करा.     
* स्वत:ला शांत ठेवा - 
जर तुमच्या जोडीदाराची नोकरी गेली, तर तुमच्या जोडीदारावर चिडण्याऐवजी शांत राहा आणि तो या परिस्थितीतून कसा बाहेर पडू शकतो याबद्दल त्याच्याशी चर्चा करावी.तसेच, त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही तुमचा पाठिंबा कसा देऊ शकता यावर चर्चा करा.
 
* पाठीचा कणा व्हा-
पती-पत्नी एकमेकांना पूरक असतात आणि कोणत्याही कठीण प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात.अशा परिस्थितीत कठीण काळात तुमच्या जोडीदाराचा आधार बनण्याचा प्रयत्न करा.त्याला केवळ आर्थिकच नव्हे तर भावनिकदृष्ट्या मदत करा.यासाठी नेहमी त्याच्याशी शक्य तितक्या सकारात्मक गोष्टी बोला.जेव्हा जोडीदार  आशावादी बनेल, तेव्हा गोष्टी बर्‍याच प्रमाणात स्वतःहून स्थिर होऊ लागतात.
 
* कोणाशीही उल्लेख करू नका- 
ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये तुम्हाला हुशारीने वागावे लागेल.हे वैयक्तिक संकट आहे.तुमच्या मित्रमैत्रिणींशी किंवा कुटुंबियांशी याबद्दल बोलणे टाळा, कारण यामुळे तुमच्या जोडीदाराला लाज वाटू शकते.
 
* जॉब हंटमध्ये मदत करा -
तुमच्या जोडीदाराला असे वाटू द्या की या कठीण काळात तो एकटा नाही, तुम्ही त्याला प्रत्येक प्रकारे मदत करण्यासाठी तयार आहात.तिला नवीन नोकरीसाठी बायोडाटा तयार करण्यास मदत करा.जर तुमचे नेटवर्क मजबूत असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पार्टनरला नोकरी शोधण्यात मदत करू शकता.