गुरूवार, 6 मार्च 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 6 मार्च 2025 (17:07 IST)

टोमॅटो मेथी पुलाव रेसिपी

tomato vegetable
साहित्य-
शिजवलेला भात - चार कप
कांदा - एक 
आले - एक इंच
लसूण - चार पाकळ्या
टोमॅटो - तीन 
मेथीची पाने - दोन कप
लाल तिखट - एक टीस्पून
धणेपूड - दोन चमचे
गरम मसाला - एक टीस्पून
दालचिनीची काडी - एक 
लवंगा - दोन 
वेलची - एक 
तूप - दोन टेबलस्पून
मीठ चवीनुसार 
कृती-
सर्वात आधी कांदा, टोमॅटो, मेथी बारीक चिरून घ्या. नंतर प्रेशर कुकरमध्ये पाणी आणि थोडे मीठ घालून भात शिजवा. आता एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि त्यात दालचिनी, लवंग, वेलची असे गरम मसाला घाला आणि हलके शिजू द्या. नंतर काही सेकंदांनी कांदा घाला आणि हलके परतून घ्या. आता आले आणि लसूण घाला आणि एक मिनिट शिजू द्या. आता टोमॅटो घाला आणि ते मऊ होईपर्यंत शिजवा. टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यात लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला पावडर आणि मीठ घाला. ते चांगले मिसळा आणि तीन चार मिनिटे शिजू द्या. नंतर काही मिनिटांनी मेथी घाला आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा. मेथी शिजू द्या. मेथी शिजल्यानंतर त्यात शिजवलेला भात घाला आणि चांगले मिसळा. व साधारण दोन मिनिटे शिजू द्या, आता तयार टोमॅटो मेथी भात प्लेटमध्ये काढा व वरून कोथिंबीर गार्निश करा तर चला तयार आहे आपली टोमॅटो मेथी भात रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.