शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

अळू वडी

अळू वडी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 5 अळूची पाने, 1 वाटी बेसन, 1 चमचा तिखट, मीठ चवीप्रमाणे, चिंच, गूळ, धने व जिरे यांची पूड, हिंग तीळ, मोहरी, जिरं व तेल.

कृती : सर्वप्रथम पाने स्वच्छ धुवावी व बेसनमध्ये चिंचेचे पाणी, गूळ, तिखट, मीठ धन्याजिर्‍याची पूड व हिंगाची पूड घालून पीठ भज्यांच्या पीठासारखे चांगले भिजवावे. नंतर अळूच्या पानाच्या पालथ्या बाजूवर पीठ पातळसर लावावे. त्याच्यावर दुसरे पान ठेवून त्याला पीठ लावावे. या प्रमाणे एकावर एक अशी चार पाने ठेवावी. नंतर त्या पानांची गुंडाळी करून ती वाफवून घ्यावी व काप करावेत. फोडणीत तीळ घालून त्यात ते काप चांगले परतून घ्यावे.