क्रुटोन रायता
साहित्य: 2 कप घट्ट दही, सायीसकट विरजलेले, नसल्यास अर्धा कप क्रीम घाला. ब्रेडचे तळलेले लहान तुकडे 1 कप, पाइनॅपल रिंग्ज बारीक चिरून अर्धा कप, मीठ, मिरेपूड, साखर चवीनुसार, थोडे लाल डाळिंबाचे दाणे सजावटसाठी.
कृती: गार दही व गार क्रीम एकत्र करा. मीठ, मिरेपूड, साखर घाला. तळलेले ब्रेडचे तुकडे सोडून इतर सर्व घाला. सर्व्ह करणपूर्वी ब्रेडचे क्रुटोन्स घाला. थोडे डाळिंबाचे दाणे पेरा.