Recipe, Pakkruti, Veg, Nonveg | चटकदार मटकीची उसळ
साहित्य : ५00 ग्रॅम मोड आलेली मटकी, ३ मध्यम आकाराचे कांदे, १0-१२ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, चवीनुसार तिखट (लाल), मीठ, २ टे. स्पू. गोडा मसाला, २ टे. स्पू. किसलेलं सुकं खोबरं, १ टे. स्पू. खसखस, २ टोमॅटो, कोथिंबीर, तेल, मोहरी, हिंग.कृती कांदा जाड चिरून थोड्या तेलावर लालसर परतून घ्या. किसलेलं खोबरे भाजून घ्यावं. मोड आलेली मटकी, मीठ पाणी टाकून शिजवून घ्यावी. कांदा, खोबरं, लसूण, आलं, लाल तिखट, गोडा मसाला, खसखस, टोमॅटो, थोडी कोथिंबीर मिक्स करून हे जिन्नस मिक्सरमधून वाटून घ्यावं. नेहमीप्रमाणे तेलात हिंग मोहरीची फोडणी करून वाटलेला मसाला घालून तो परतावा. चांगले परतल्यावर उकडलेली मटकी पाण्यासकट त्यात घालावी. १0-१५ मिनिटं मंद आचेवर मटकी उकडून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा