1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी

चण्याच्या डाळीचे वडे

चण्याच्या डाळीचे वडे पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : दोन वाट्या चण्याची डाळ, एक मोठा कांदा, चार-सहा मिरच्या, मूठभर कढीलिंबाची पाने, चार चमचे चण्याचे पीठ, मीठ, तेल, धने.

कृती : चण्याची डाळ दोन तास भिजत ठेवावी. कांदा चिरून घ्यावा. मिरच्यांचे तुकडे करावे. डाळ उपसून घ्यावी. डाळ, मिरच्यांचे तुकडे, कांदा, कढीलिंब, धने एकत्र करून, पाणी न घालता, मिक्सरवर जाडसर वाटावे. वाटलेले मिश्रण फार सैल वाटल्यास जरूरीप्रमाणे डाळीचे पीठ घालावे. चवीप्रमाणे मीठ घालून वडे करून तळावेत. हे वडे चवदार व कुरकुरीत लागतात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा