बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

दाल दो प्याजा

साहित्य: 1 कप तुरीची डाळ, 3 कांदे चिरून, 5 लसूण, 3 चमचे किसलेलं आलं, 4 हिरव्या मिरच्या चिरून, 1 चमचा जिरे, 1 टोमॅटो, मीठ, साखर, आवडत असल्यास कढीलिंब, सुक्या लाल मिरच्या व हिंग पावडर.


 
कृती: धुतलेली डाळ, निम्मे चिरलेले कांदे, थोडं आलं व थोड्या लसूण पाकळ्या, मीठ व अर्धा चमचा हळद घालून व लागेल तसं पाणी घालून, शिजवून घोटा. त्यात 1 चमचा लोणी घाला. थोड्या तेलात उरलेला कांदा गुलाबी  
करा. जिरे, टोमॅटो, उरलेलं आलं, लसूण सर्व घाला. कढीलिंब, हिंग, मिरचीही घाला. शिजलेली डाळ, थोडं पाणी घाला. देण्यापूर्वी कोथिंबीर, बारीक व लांब चिरलेली हिरवी मिरची घाला.