फलाहारी पुरी वडे
|
250 ग्रॅम शिंगाड्याचे कणीक, 2 उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, तळण्यासाठी तेल.
कृती :
सर्व साहित्य एकत्र करून पोळ्यांसाठी कणीक मळतो त्याप्रमाणे मळून घ्या. छोटे-छोटे गोळे घेऊन वड्यांचा आकार द्या. तेलात तळून घ्या.
| |
हेच साहित्य घेऊन पूर्या देखिल बनविल्या जातात. बटाट्याची भाजी किंवा शिंगाड्याच्या कढी सोबत सर्व्ह करा.
