1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
  6. भरल्या कांद्याची भाजी

Marathi veg Recipe, Nonveg Recipe | भरल्या कांद्याची भाजी

WD
साहित्य : लहान आकाराचे कांदे सबंद 1/2 किलो. किसलेले कोरडे खोबरे पाव वाटी, तीळ 2 चमचे, पाव वाटी दाणे, 1/2 चमचा जिरे, 1 चमचे धने, 1 चमचा गोडा मसाला, ओले खोबरे, कोथिंबीर, तिखट, मीठ, चिंचेचे पाणी, गूळ, फोडणीचे साहित्य.

कृती : कांद्याच्या वरचा व थोडा खालचा भाग व साल काढून चार फाकी होतील अशी चिरावीत. नंतर खोबर्‍याचा कीस, तीळ व शेंदगाणे, धने, जिरे हे सर्व कोरडे भाजून त्याची पेस्ट करावी. या पेस्टमध्ये चवीप्रमाणे मीठ, तिखट, गूळ, गोडा मसाला, थोडी हळद 1-2 चमचे तेल व चिंचेचे पाणी घालून बारीक वाटावे व हे सर्व मिश्रण कांद्याच्या चार फाकीमध्ये फाक वेगळी होऊ न देता दाबून भरवे. कढाईत फोडणी तयार करून त्यात भरलेले कांदे टाकावेत व मंद आचेवर ठेवून थोड्या वेळाने रस्स्याकरिता गरम पाणी टाकून उकळू द्यावे व साधारण नरम कांदे झाल्यावर त्यात कोथिंबीर व ओले खोबरे टाकावे. ही भाजी फारच चवदार लागते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा