शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

मका-ब्रेड रोल

साहित्य : मक्याच्या दाण्यांचा कीस 2 वाट्या, हिरवी मिरची 25 ग्रॅम, लसूण 5-6 पाकळ्या, आले, जिरे, शोप, हळद, लाल मिरची, मीठ, कोथिंबीर, तेल, ब्रेड 12 स्लाइस.
 
कृती : आले-लसूण, हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घ्या. एक चमचा तेल गरम करा. त्यात जिरे, शोप टाका. त्यात मक्याचा कीस, लाल मिरची, हळद आणि मीठ टाका. थोडे भाजून घ्या. हिरवी मिरची आणि आल्याचा तयार केलेला मसाला टाका. कोथिंबीर टाका. गार झाल्यावर दीड इंचाएवढे लांब रोल बनवा.
 
ब्रेडचे काठ कापून घ्या. ब्रेड पाण्यात भिजवून पानी काढून टाका. तयार केलेला रोल ब्रेडमध्ये भरा. हा रोल चार-पाच तास फ्रीजमध्ये ठेवा. नंतर गरम तेलात गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या. गरम गरम ब्रेड-मका रोल टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.